Honda SP 125: नमस्कार मित्रांनो, बाईक जगतामध्ये आपल्या शानदार कामगिरीमुळे तसेच वाहन उद्योगातील आपल्या बेस्ट क्वालिटी आणि परफॉर्मन्समुळे होंडा कंपनी नेहमीच ग्राहकांची विश्वसनीय कंपनी म्हणून ओळखली जाते. येत्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला बरेच काही अपडेट्स सह Honda SP 125 आपले शानदार प्रदर्शन करत आहे. या बाईक मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत जे की, बाईक हँडलिंग तसेच आकर्षक डिझाईन साठी खूप महत्त्वाचे आहे. तसेच नवीन फीचर्स आणि बऱ्याच काही नवीन गोष्टी समाविष्ट करण्यात आलेले आहेत. चला तर मग पाहूया नवीन Honda SP 125 मध्ये काय काय नवीन गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• हे पण वाचा 👇:
•Triumph Speed Twin 900 बाईक आता झाली 10 हजार रुपये ने जास्त महाग | नवीन बदलासह जाणून घ्या किंमत |
• Honda SP 125 च्या आकर्षक डिझाईन मध्ये बदल :
नवीन Honda SP 125 मध्ये नवीन आकर्षक रंगांचा समावेश करण्यात आले आहे यामध्ये पर्ल इग्नियस ब्लैक, मैट एक्सिस ग्रे मेटैलिक, पर्ल साइरन ब्लू, इंपीरियल रेड मेटैलिक और मैट मार्वल ब्लू मेटालिक हे कलर आपल्याला मिळतात. त्याचप्रमाणे Honda SP 125 बाईकच्या आकर्षक डिझाईन मध्ये आपल्याला असे दिसून येते की, बाईकची हेड आणि टेल लाईट पूर्वीच्या पेक्षा अजून शार्प आणि आकर्षक बनवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आताच्या अपडेटेड नवीन मॉडेल मध्ये, आपल्या 4.2 इंचाची टीएफटी स्क्रीन दिलेली आहे जी की होंडा रोडसिंक या नवीन ॲपशी कम्पैटिबिलिटी सोबत येते. तिच्यासोबत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे. त्याचप्रमाणे USB – पोर्ट सी- टाईप चार्जिंग सुद्धा समाविष्ट आहे.
• हे पण वाचा 👇:
•Honda SP 125 मधील नवीन वैशिष्ट्ये :
Honda SP 125 मध्ये नवीन वैशिष्ट्य समाविष्ट करण्यात आलेली आहेत. जसे की टर्न बाय टर्न नेवीगेशन, 4.2 ची टी एफ टी टच स्क्रीन ज्यामुळे आपल्याला बाईक चालवत असताना अनेक प्रकारे मदत होते आणि या सोबतच आपल्याला एक डिजिटल ऍप जोडण्यात आलेली आहे जिचे नाव होंडा रोड सीन्स आहे. आणि तिच्या सोबतच आपल्याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सुद्धा मिळते. त्याचप्रमाणे नवीन वैशिष्ट्यांमध्ये कॉल आणि एसएमएस अलर्ट, स्पीडोमीटर,ऍडोमीटर, ट्रिप मीटर, यु एस बी- सी चार्जिंग पोर्ट , गिअर पोझिशन इंडिकेटर यासारखे अनेक वैशिष्ट्ये आपल्याला नवीन Honda SP 125 मध्ये समाविष्ट केलेली दिसून येतात.
• हे पण वाचा 👇:
• Honda SP 125 चे नवीन अपडेटेड दमदार आणि पावरफुल इंजिन :
नवीन Honda SP 125 मध्ये आपल्याला नवीन अपडेटेड दमदार आणि पावरफुल इंजिन पाहायला मिळते.नवीन OBD2B कंप्लायंट 124cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे जे 10.8PS आणि 10.9Nm जनरेट करते,तसेच हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यामुळे SP125 ही शहरात आणि महामार्गांवर चालण्यासाठी उत्तम मोटरसायकल बनते. त्यामुळे आपल्याला या बाईकची सवारी करण्यास अजून चांगले अनुभव मिळेल. तसेच बाईच्या आधुनिक आणि आकर्षक रंगामुळे बाइक अजूनच खाज दिसत असल्यामुळे बाईकच्या लुक मुळे ग्राहकांना ती अजूनच आकर्षित.
• हे पण वाचा 👇:
• नवीन Honda SP 125 चे मायलेज :
Honda SP 125 ही बाईक जपानी कंपनी द्वारा निर्मित एक जबरदस्त बाईक आहे. दररोजच्या वापरासाठी तसेच वापरण्यासाठी ही बाईक अतिशय चांगले मायलेज देते. मायलेज बद्दल एक्युरेट सांगायचे झाल्यास ही बाईक आपल्याला 60 किलोमीटर / लिटर ते 65 किलोमीटर / लिटर इतक्या जबरदस्त मायलेज देते. त्यामुळेही बाईक आपण दूरवरच्या रायडींगसाठी सुद्धा नेऊ शकतो.
• हे पण वाचा 👇:
• नवीन 2025 Honda SP 125 नवीन वर्षात कोणाशी प्रतिस्पर्धा करेल :
Honda SP125 ही बाईक नवीन वर्षामध्ये TVS Raider 125 आणि Hero Xtreme 125R सोबत डायरेक्ट मुकाबला करेल . Hero Xtreme 125R ही या व्हेरियंट मधील एकमेव बाईक आहे जी सिंगल-चॅनल ABS ऑफर करते तर TVS Raider ला iGo असिस्ट व्हेरियंट मिळतो.
• Honda SP125 चीं किंमत:
होंडा कंपनीकडून Honda SP 125 ला दोन व्हेरी मध्ये लॉन्च केले आहे. ते म्हणजे ड्रम व्हेरियंट आणि डिस्क व्हेरियंटमध्ये . ड्रम व्हेरिएंटची किंमत 91,771 रुपये आहे तर डिस्क व्हेरिएंटची किंमत ही कंपनीकडून 1,00,284 रुपये एवढी ठेवण्यात आलेली आहे. दोन्ही किंमती एक्स-शोरूम, दिल्ली.
• हे पण वाचा 👇:
•खरंच Toyota Innova Crysta आपल्या फॅमिली साठी एक परफेक्ट कार आहे का? चला जाणून घेऊया |
• Honda SP 125 चा EMI कसा कराल:
मित्रांनो जर आपल्याला Honda SP125 ही बाईक ईएमआय वर खरेदी करायची असेल तर, आपण कमीत कमी डाऊन पेमेंट करून आणि कमीत कमी एमआय चा हप्ता ठेवून सुद्धा ही बाईक खरेदी करू शकतो. 15000 च्या डाउन पेमेंट वर आपल्याला 2947 ते 3990 पर्यंतचा दर महा एम आय भरून आपण गाडी खरेदी करू शकता. प्रमाणे आपल्याला जर ऍक्युरेट आणि अजून चांगले काही ईएमआय ऑफर हवे असतील तर आपण आपल्या होंडाच्या जवळच्या शोरूम ला भेट देऊ शकता.
• हे पण वाचा 👇:
•ऑफर ऑफर !Maruti Suzuki Swift वर मिळत आहे 75 हजार रुपयांची भारी सूट | पहा किंमत आणि स्पेसिफिकेशन |
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.