Land Rover Range Rover: नमस्कार मित्रांनो, Land Rover Range Rover ही एक अशी लक्झरी SUV आहे, जिचा विचार बजेट च्या पुढे जाऊन करावा लागतो. ही SUV एक अविश्वसनीय आणि अतुलनीय आराम आणि अनुभव देते. सध्या तिची पाचवी पिढी मार्केट मध्ये उतरली आहे. अतिशय आरामदाई आणि आकर्षक असणारी ही SUV जबरदस्त क्लासी लुक सोबत अतुलनीय फीचर्स, इंजिन, मायलेज, सेवा आणि अनुभव देते. जर आपण संपूर्ण दिवस जरी या लक्झरी कार मध्ये घालवायचा ठरवला तरी आपल्याला या कार मध्ये वेळ कमी पडेल, एवढे फीचर्स आणि आराम इथे मिळतो. जबरदस्त कलर क्वालिटी , चाके, कार ची संपूर्ण बाह्य बाजू आणि संपूर्ण आतील भाग कुठेच आपल्याला या कारमध्ये कमीपणा दाखवत नाही. इतरांपासून वेगळ विचार ठेवणाऱ्यांसाठी तसेच आयुष्यात काहीतरी लक्झरी अचीव करणाऱ्यांसाठी ही SUV आपल्या स्वप्नांची पूर्तता करते.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!चला तर मग मित्रांनो, पाहूया Land Rover Range Rover बद्दल अधिक माहिती, तिचे वेगळेपण, luxury लुक, आराम, अनुभव आणि इतर सर्व लक्झरी वैशिष्ट्ये.
• Land Rover Range Rover ची लक्झरी वैशिष्ट्ये :
Land Rover Range Rover मध्ये अनेक लक्झरी वैशिष्ट्ये येतात, ज्यांची लिस्ट खूप मोठी आहे. ही लक्झरी SUV 5 ते 7 सीटर असून खूप मोठ्या स्पेस सोबत येते. एखाद्या लक्झरी घराप्रमाणे ही कार असून लांब, रुंद आणि उंच आहे. ती जवळजवळ ५.३ मीटर लांब, २.२ मीटर रुंद आणि जवळजवळ १.९ मीटर उंचीची आहे, ज्यामुळे ही कार रस्त्यावर चालताना लोकांचे मोठे आकर्षण ठरते आणि पटकन लक्ष वेधून घेते. पाचव्या पिढीतील ही रेंज रोवर असून अतिशय आकर्षक आणि सौंदर्याची परिभाषाच ठरलेली आहे. तिची चाके अतिशय आकर्षक असून कार ला साजेशे आणि कारच्या सौंदर्यात भर घालणारे आहेत.
कार मध्ये मागील बाजूस हेडलाईट असून ते एका स्लिम ब्लॅक पॅनलच्या खाली येतात जे की, Land Rover Range Rover चे वेगळेपण दर्शवतात. इतर वैशिष्ट्य आपण पुढील प्रमाणे सविस्तर पाहूया :
• प्रशस्त आणि लक्झरी केबिन : इतर सर्व कार च्या तुलनेत Land Rover Range Rover ची केबिन ही तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे असल्याचा अनुभव देते. तुम्ही एका लक्झरी कार चे मालक आहात, हे कारमध्ये बसल्यानंतर वेळोवेळी लक्षात येते. अतिशय लक्झरी लूक, आलिशान लँड यॉट, त्यामध्ये अतिशय उच्च दर्जाचे लेदर, तसेच ॲल्युमिनियम ने फिनिशिंग केलेले लेआउट मिळते. केबिनमध्ये बसताना आपल्याला लक्षात येते की, आपण एका प्रशस्त आणि लक्झरी कार मध्ये बसत आहोत, आणि ती एक आलिशान आणि आपल्या मेहनतीचा पुरावा आहे, आणि ती आपल्या मालकीची आहे.
• डिजिटल आणि लक्झरी फंक्शन्स :
Land Rover Range Rover मध्ये कार मध्ये बसणाऱ्यांसाठी तसेच मालकासाठी अनेक डिजिटल आणि लक्झरी फंक्शन्स आहेत, जे तुम्हाला आराम आणि लक्झरी सेवा पुरवतात. त्यामध्ये सर्वात पहिले सांगता येते की, इथे आपल्याला लक्झरी इलेक्ट्रिकली अड्जस्टेबल सीड्स मिळतात, हीटिंग, कूलिंग, मेमरी आणि मसाज फंक्शन, एक फिक्स सेंटर कन्सोल, जो कारला मागच्या आणि पुढच्या भागांमध्ये विभागतो, त्यानंतर मोटाराइज्ड कपहोल्डर्स आणि मोटाराइज्ड फोल्ड-आउट टेबल, त्याचप्रमाणे मिनी फ्रिज साठी एक्सेसिबल फंक्शन- त्यामुळे आपल्याला एक छोटी बॉटल थंड पाण्यासाठी साठवू शकतो, तिथेच आपल्याला दोन SV- ब्रँडेड ग्लास मिळतात जे की पाणी पिण्यासाठी आहेत.
त्यानंतर, इतर डिजिटल आणि लक्झरी फंक्शन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते की, त्याच कन्सोलमध्ये एक डिजिटल फिक्स्ड टॅबलेट देण्यात आलेले आहे, जे मागच्या साईडचे सर्व फंक्शन्स नियंत्रित करते. जसे की,मागील सीट्सची स्थिती, बॉलस्टरिंग, लंबर सपोर्ट, मसाज मोड आणि त्यांच्या संबंधित हवामान सेटिंग्जच्या बाबतीत संपूर्ण माहिती मिळते.
त्याचप्रमाणे, जर आपण मागच्या सीटवर असाल आणि आपल्याला, अजून आराम हवा असेल तर, पुढची सीट आपण पुढे सरकवून पुढच्या प्रवाशाला कुठलाही त्रास न देता आराम मध्ये बसू शकता.
त्याचप्रमाणे वायरलेस चार्जिंग पॅड यामध्ये, वायरलेस फोन चार्जर – USB -C फास्ट चार्जर, लॅपटॉप चार्जर, HDMI पोर्ट, मल्टीटोन ॲम्बिएट लाइटिंग त्यामुळे रात्रीच्या वेळी आपला मूड एकदम जबरदस्त सेट होईल , मोठा पॅनोरमिक सनरूफ, मोठ्याने प्रशस्त खिडक्या ज्यामुळे तुम्ही हवेशीर वातावरणाचा आनंद घेऊ शकाल, त्याचप्रमाणे संपूर्ण केबिन आणि मागचा भाग लक्झरी असून चांगली स्पेस आणि आराम मिळते.
• Land Rover Range Rover चे इंटेरियर :
• जबरदस्त लक्झरी लेदर लेआउट :Land Rover Range Rover मध्ये जबरदस्त लक्झरी लेदर लेआउट पाहायला मिळते. ज्याची फिनिशिंग एकदम जबरदस्त आणि लक्झरी असून अतिशय चांगल्या क्वालिटीचे आहे.
• लक्झरी डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले : लक्झरी डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आहे. याच्या मदतीने Land Rover Range Rover चालू असताना अनेक प्रकारे नियंत्रण आणि मदत मिळते.
• डिजिटल टचस्क्रीन : त्यानंतर त्याच्या खाली एक डिजिटल टच स्क्रीन आहे ज्यामध्ये अनेक डिजिटल फंक्शन्स आपल्याला मिळतात. जसे की, क्लायमेट कंट्रोल सारख्या फंक्शनमुळे कार मधील वातावरण नियंत्रण करता येते.
• स्वच्छ लेआउट : संपूर्ण Land Rover Range Rover ही स्वच्छ लेआउटने कव्हर केलेली असून संपूर्ण कार ही लक्झरी आणि आरामदायी आहे.
• एक्स्ट्रा स्टोरेज : कार मध्ये एक्स्ट्रा स्टोरेज आहे, ज्यामुळे एक्स्ट्रा सामान आपल्याला त्या स्टोरेज मध्ये ठेवता येते आणि चांगले आराम मिळते.
• साऊंड सिस्टिम : आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Land Rover Range Rover मध्ये इतके जबरदस्त साऊंड सिस्टिम आहे की, संपूर्ण दिवसभर आपण कार मध्ये थोडेही बोर न होता घालवू शकतो. तसेच इतके स्पीकर आहेत की, ते किती आहेत हे सांगता येणार नाही.
• बॅक साइड इन्फोटेनमेंट सिस्टीम : बॅक साईडला 13.1 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळते.
• फ्रंट साईड इन्फोटेनमेंट सिस्टीम : फ्रंट साईडला सुद्धा 13.1 इंच इन्फोटेनमेंट सिस्टीम मिळते. या फंक्शन मुळे कार चालकास समोर बसून मागच्या सर्व फंक्शन्स वर नियंत्रण ठेवता येते. जसे की मागची साईड हवेशीर राहील तसेच, मागच्या प्रवाशांची मसाज फंक्शन, तसेच कारचे संपूर्ण नियंत्रण आपल्या हातात राहील.
• डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले : Land Rover Range Rover लक्झरी कार मध्ये आपल्या डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळते. यामध्ये स्पीडोमीटर, ॲडोमीटर, टॅकोमीटर सारखे फंक्शन्स मिळतात.
• Land Rover Range Rover सेफ्टी फीचर्स :
सेफ्टी फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, Land Rover Range Rover मध्ये सेफ्टी ची चिंता करण्याची बिलकुलच गरज नाही. फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये आपल्याला, 360 डिग्री सराऊंड- व्ह्यू कॅमेरा मिळतो, ऍटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग मिळते, ऍडॉप्टीव्ह क्रूज कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, एअरबॅग्ज, तसेच इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण सारखे महत्त्वाचे सेफ्टी फीचर्स मिळतात.
• Land Rover Range Rover इंजिन आणि मायलेज :
इंजिन : इंजिन आणि मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास, Land Rover Range Rover मध्ये मोठे आणि दमदार शक्तिशाली इंजिन मिळते. ते चांगले टॉर्क आणि शक्ती जनरेट करते ज्यामुळे, कार मालकास किंवा ड्रायव्हरला चांगले मायलेज मिळते. इथे आपल्याला 2,996cc आणि 2,998cc चे 4.4 लिटर ट्वीन टर्बो पेट्रोल इंजिन मिळते. हे अनुक्रमे 346- 394 bhp पावर आणि 550 – 700 Nm चे टॉर्क जनरेट करते. त्याचप्रमाणे 8- स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत जोडलेले आहे.
मायलेज : तसेच मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास, Land Rover Range Rover ही SUV सरासरी 14kmpl इतके मायलेज देते.
• Land Rover Range Rover ची किंमत:
किमती बद्दल बोलायचे झाल्यास, Land Rover Range Rover ची किंमत ही 2.40 कोटी ते 4.98 कोटी इतकी आहे. भव्य आकार, लक्झरी डिझाईन, लक्झरी केबिन, अनेक लक्झरी वैशिष्ट्यांची लिस्टच मिळते तर, एका फॅमिली साठी संपूर्ण आराम या SUV मध्ये मिळतो. त्याचप्रमाणे उच्च दर्जाची सुरक्षा, तसेच इतरांपेक्षा तुम्हाला वेगळे असल्याची जाणीव करून देणारी ही SUV असून तिच्या किमती बद्दल जास्त विचार केला तर अन्याय होईल.
Land Rover Range Rover, Land Rover Range Rover features, Land Rover Range Rover price,Auto news in Marathi,Auto., Auto news in Marathi,luxury car.
• हे पण वाचा 👇:
•नवीन वर्षात खरेदी करा TVS Apache RTR 310 बाईक आणि मिळवा खतरनाक माईलेज|पहा किंमत आणि फीचर्स|
•पैसा वसूल! Honda Unicorn बाईक | 60kmpl चे मायलेज आणि कौटुंबिक वापरासाठी एकदम जबरदस्त |पहा किंमत |
•महागाई मध्ये मिळत आहे सर्वांत स्वस्त Ampere Magnus Neo स्कूटर |पहा किंमती सोबतच फीचर्स |
•123km रेंज वाली Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटर|मासिक EMI फक्त 3,022 रुपये |
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.