Royal Enfield Shotgun 650: मार्केटमध्ये रॉयल एनफिल्ड ची बाईक म्हंटली तर तिची स्टाईल आणि अग्रेसिव्ह लुक सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो. रॉयल एनफिल्ड चे नाव घेताच एक आकर्षक स्पोर्टी लुक आणि दमदार परफॉर्मन्स असलेली बाईक असेल हे लक्षात येते. भारतीय बाजारामध्ये रॉयल एनफिल्ड बाईकचे अनेक वेरीएंट्स आहेत. त्यातच आता Royal Enfield Shotgun 650 हे व्हेरिएंट खूप चर्चेमध्ये आहे. कारण ही शॉर्टगन बाईक अतिशय दमदार आणि आकर्षक लुक सोबतच चांगल्या इंजिन आणि परफॉर्मन्सचा दावा करते. रॉयल एनफिल्ड च्या बाईक्सच मुळामध्ये तरुण पिढीतील सळसळत्या रक्ताच्या युवकांसाठी बनवलेली आहे. जे तरुण आपल्या जीवनात स्टायलिंग आणि हटके जीवन जगण्याला महत्त्व देतात, अशा तरुण युवकांसाठी Royal Enfield Shotgun 650 ही बाईक एकदम जबरदस्त आहे. पावरफुल इंजिन दमदार मायलेज तसेच हटके डिझाईन, फीचर्स आणि किंमत या सर्वांविषयी तरुणांमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चला तर मग मित्रांनो पाहूया, Royal Enfield Shotgun 650 विषयी सविस्तर माहिती.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• Royal Enfield Shotgun 650 ची किंमत :

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Royal Enfield Shotgun 650 ची मार्केट किंमत ही 3.59 लाख ते 4.24 लाख इतकी आहे. इथे आपल्याला चार व्हेरिएंट उपलब्ध आहेत त्यानुसार त्यांच्या किमती पुढील प्रमाणे आहेत.
शीट मेटल ग्रे रंग असलेल्या बेस व्हेरिएंटसाठी 3 लाख 59 हजार 430 रुपये इतकी आहे , त्यानंतर दुसरे व्हेरियंट मिड-स्पेक प्लाझ्मा ब्लू आणि ग्रीन ड्रिल रंग असलेल्या व्हेरिएंट साठी किंमत 3 लाख 70 हजार 138 रुपये आहे, तर टॉप-एंड स्टेन्सिल व्हाइट व्हेरीएंट साठी किंमत ही 3 लाख 73 हजार रुपये इतकी आहे. सर्व व्हेरिएंट एकदम आकर्षक आणि जबरदस्त असून आपण आपल्या बजेटनुसार व्हेरियंट निवडू शकतो.
• Royal Enfield Shotgun 650 ची हटके आणि आकर्षक डिझाईन :

डिझाईन बद्दल सांगायचे झाल्यास, Royal Enfield Shotgun 650 ची डिझाईन एकदम आकर्षक आणि हटके आहे. बाईकला पाहिल्यानंतर लगेचच कुणीही तिच्या प्रेमात पडेल एवढी आकर्षक आणि हॉट अशी ही बाईक आहे. रॉयल एनफिल्ड सेगमेंटमधील सर्वात आकर्षक दिसणाऱ्या बाईक पैकी Royal Enfield Shotgun 650 ही एक बाईक असून तिची फिनिशिंग अतिशय जबरदस्त आणि आकर्षक आहे. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या इतर सर्व बाईक पेक्षा वेगळी दिसणारी ही बाईक असून हटके आणि सुंदर स्टायलिंग सोबतच चांगल्या कामगिरी सोबत ही बाईक तरुण बाईक चालकास एक चांगला आणि वेगळा अनुभव देते.
Royal Enfield Shotgun 650 ही एक बॉबर सारखी दिसणारी बाईक असून, सहसा अशी हटके डिझाईन पाहायला मिळत नाही. संपूर्ण स्पोर्टी लुक सोबत बाईकच्या इंधन टाकीचे सुद्धा स्पोर्टी लुक बाईकला अजूनच खास बनवते. त्याचप्रमाणे Royal Enfield Shotgun 650 चे खास आकर्षक रंग थीम बाईक रायडर्स ना एक वेगळी ओळख देते.
• Royal Enfield Shotgun 650 चे फीचर्स :

आकर्षक आणि हटके लुक सोबतच Royal Enfield Shotgun 650 या बाईक चे फीचर्स सुद्धा आपल्याला जबरदस्त असलेले पाहायला मिळतात. या बाईक मध्ये फीचर्स काही जास्त दिलेले नसले तरी सर्व व्यवहारिक फीचर्स आपल्याला इथे मिळतात जसे की, यूएसबी चार्जिंग पोर्ट जे की सर्व ग्राहकांना अपेक्षित आहे, त्यानंतर बल्ब इंडिकेटर, यामध्ये एलईडी हेडलाईट आणि टेल लाईट दिलेली आहे, त्याचप्रमाणे टर्न बॅटर नेवीगेशनची सुविधा मिळते, सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल यासारखी बेसिक फीचर्स मिळतात.
• Royal Enfield Shotgun 650 बाईक चे इंजिन :
अतिशय चपळ आणि आकर्षक असणाऱ्या या बाईचे इंजिन सुद्धा शक्तिशाली आहे. Royal Enfield Shotgun 650 बाईक चे इंजिन हे 648cc चे ट्विन-सिलेंडर एअर-/ऑइल-कूल्ड इंजिन असून ते चांगली हॉर्स पॉवर आणि टॉर्क जनरेट करते. आकडेवारी सांगायचे झाल्यास, 47.65 PS ची हॉर्स पॉवर आणि 52 Nm चे टॉर्क हे इंजिन जनरेट करते. बाईकचे इंजिन अतिशय जबरदस्त टॉर्क जनरेट करत असल्यामुळे, बाईकला गर्दीच्या ठिकाणी तसेच ऑफ रोड आणि ऑन रोड , ट्राफिक मध्ये तसेच मोकळ्या रस्त्यावर बाईकचा वेग वाढवण्यासाठी खूप सोपे आहे.
•Royal Enfield Shotgun 650 चे मायलेज:
Royal Enfield Shotgun 650 ही बाईक 650cc सेगमेंट मधील इतर बाईक पेक्षा खूप वेगळी बाईक असून दमदार मायलेज ची हमी देते. अतिशय जबरदस्त स्पोर्टि लुक आणि जबरदस्त कामगिरी, आराम आणि इतर वैशिष्ट्यांमध्ये बाईक ला नाव ठेवता येण्यासारखे नाही. थोडी महागडी वाटत असली तरी, Royal Enfield Shotgun 650 बाईक चांगल्या गुणवत्तेसोबतच मायलेज सुद्धा चांगले देते. त्यामुळे लांबच्या रायडींग साठी, शहरामध्ये ट्राफिक मध्ये हाताळणीसाठी, तसेच मोकळ्या रस्त्यांवर हाताळणीसाठी सुद्धा एकदम जबरदस्त आहे. मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास, 22kmpl चे मायलेज ही बाईक देते.
• Royal Enfield Shotgun 650 बाईक Images :







• Royal Enfield Shotgun 650 बाईक चे प्रतिस्पर्धी :
तसे तर Royal Enfield Shotgun 650 ला कुणीही डायरेक्ट Rival नाही. परंतु त्याच किमतीमध्ये प्रतिस्पर्धी म्हणून पहायचा असेल तर Royal Enfield Shotgun 650 ची पहिली प्रतिस्पर्धी बाईक म्हणून जावा पेराक आणि जावा 42 बॉबर सांगता येतात.
Royal Enfield Shotgun 650, Royal Enfield Shotgun 650 price,Auto news in Marathi,Auto,Automobile,Automobile news,Bike news,new bike,royal enfield bike.
• हे पण वाचा 👇:
•नवीन वर्षात खरेदी करा TVS Apache RTR 310 बाईक आणि मिळवा खतरनाक माईलेज|पहा किंमत आणि फीचर्स|
•पैसा वसूल! Honda Unicorn बाईक | 60kmpl चे मायलेज आणि कौटुंबिक वापरासाठी एकदम जबरदस्त |पहा किंमत |
•महागाई मध्ये मिळत आहे सर्वांत स्वस्त Ampere Magnus Neo स्कूटर |पहा किंमती सोबतच फीचर्स |०
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.