Ducati Panigale V4: नमस्कार मित्रांनो, नुकतेच Ducati Panigale V4 चे नवीन रंगांमध्ये अनावरण करण्यात आलेले आहे. आताची बाईक ही पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आणि विश्वसनीय रूपात ग्राहकांच्या समोर आलेली आहे. नवीन ट्राय कलर मध्ये Ducati Panigale V4 चे जोरदार अनावरण करण्यात आलेले आहे परंतु या बाईचे फक्त काही मोजकेच उत्पादन म्हणजे 1000 युनिट पर्यंतच आहेत असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून याची एक कमी असल्याची सांगण्यात येत आहे. ब्रेक आणि सस्पेन्शन, फीचर्स, कर्ब वेट, इंजिन आणि मायलेज या सर्व बाबतीत Ducati Panigale V4 ही अतिशय शानदार असून Ducati Panigale V4 बाईक ची किंमत ही एक कार खरेदी करण्याच्या किमती इतकी आहे. त्यामुळे Ducati Panigale V4 बद्दल आपण अधिक माहिती घेणारच आहोत.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• हे पण वाचा :
Ducati Panigale V4 ची किंमत किती आहे :
Ducati Panigale V4 ही एक शानदार बाईक असून Ducati Panigale V4 च्या लाईन अप मधील जबरदस्त मॉडेल आहे. बाईकचे कलर आणि आधुनिक वैशिष्ट्ये बाईकला अजून खास बनवतात . त्याचप्रमाणे जर आपण, Ducati Panigale V4 च्या किमती बद्दल बोलायचे झाल्यास या शानदार बाईक ची किंमत ही 27.73 लाखापासून सुरू होते तर, 69.99 तिची किंमत आहे. ही एक महागडी बाईक असून गरिबांच्या बजेटमध्ये बसणारी नाही. कारण त्याच बाईकच्या किमतीमध्ये आपण एखादी फोर व्हीलर गाडी खरेदी करू शकतो. परंतु जर आपण तीस ते 70 लाखांपर्यंत बजेट ठेवत असाल तर, Ducati Panigale V4 बाईक आपल्याला खरेदी करता येते.
•हे पण वाचा 👇:
• Ducati Panigale V4 चे सर्वांत महागडे मॉडल कोणते :
Ducati Panigale V4 हे हे तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. मानक (बेसिक मॉडेल ) त्यानंतर Ducati Panigale V4 S आणि Ducati Panigale V4 R नितीन मॉडेल आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये आपल्याला असे दिसते की कंपनीकडून स्टँडर्ड व्हर्जनची किंमत ही रु. 27,72,600 लाख इतकी ठेवण्यात आलेली आहे तर, Ducati Panigale V4 S ची किंमत ही कंपनीकडून रु. 33,47,600 इतकी ठेवण्यात आलेली आहे आणि Ducati Panigale V4 टॉप-ऑफ-द-लाइन V4 R ची किंमत ही कंपनीकडून 69,99,000 रु. इतकी ठेवण्यात आलेली आहे. (सर्व किंमती एक्स-शोरूम, संपूर्ण भारत).
त्यामुळे इथे आपल्याला लक्षात येते की, Ducati Panigale V4 चे सर्वात महागडे मॉडेल हे Ducati Panigale V4 R हे आहे. तिची किंमत सर्वात जास्त, म्हणजेच 69,99,000 रुपये इतकी आहे.
•हे पण वाचा 👇:
• Ducati Panigale V4 ची टॉप स्पीड :
रायडींग च्या बाबतीत Ducati Panigale V4 ही बाईक एक अतिशय शानदार आणि जबरदस्त इंजिनसह येते. परंतु या बाईक बद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे कंपनीकडून, या बाईकचे काही मोजकेच युनिट काढण्यात येतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फक्त 1000 युनिट पर्यंतच कंपनीने बाईकचे उत्पादन केलेले आहे. त्यामुळे लिमिटेड युनिट्स मुळे बाईक आपली किंमत आणि व्हॅल्यू जबरदस्त राखते.
Ducati Panigale V4 1103cc च्या जबरदस्त पावर फुल इंडियन सोबत येते तर बाईक 216.4 PS ची शक्ती आणि 120.9 Nm चे जबरदस्त टॉर्क जनरेट करते. बाईक चे कर्ब वेट हे 198.5 किलो असून डबल डिस्क ब्रेक आहेत. सर्वात महत्त्वाचे Ducati Panigale V4 ही जबरदस्त बाईक जवळजवळ 14 kmpl चा मायलेज देते. Ducati Panigale V4 बाईक ची टॉप स्पीड सांगायची झाल्यास, बाईक 3.4 सेकंदात 299 kmph ची जबरदस्त स्पीड पकडते.
•हे पण वाचा 👇:
• Ducati Panigale V4 चे नवीन इटालियन ध्वज रंग :
Ducati Panigale V4 Tricolore चे नवीन स्पेशल एडिशन आता जगभरातील सर्वत्र बाईक बाजारात कंपनीकडून उपलब्ध केलेले आहे. या बाईकला विशेष खास पेंट योजना देण्यात आलेली आहे जी की इटालियन ध्वजाची समांतर आहे. बाईकवर संपूर्ण इटालियन ध्वज रंगवलेला आहे.
त्याचप्रमाणे Ducati Panigale V4 अजून काही बदल केले आहेत ते म्हणजे, मोटरसायकलला कार्बन फायबर व्हील, ड्राय क्लच, बिलेट ॲल्युमिनियम फूटपेग्स आणि इतर कार्बन फायबर बिट्स यांसारख्या विशेष बिट्सने सुसज्ज केले आहे. Ducati Panigale V4 Tricolore ही ब्रेम्बोची 338.5mm T-ड्राइव्ह डिस्क ब्रेक्स समोरच्या बाजूला मिळवणारी पहिली रोड बाईक आहे. या रेस डिस्क्स आहेत ज्या वर्ल्ड सुपरबाइक रेसिंग मशीनवर दिसतात.
• हे पण वाचा 👇:
•Ducati Panigale V4 ची आधुनिक सुसज्ज वैशिष्ट्ये :
Ducati Panigale V4 ही आधुनिक सुसज्ज वैशिष्ट्यांनी भरपूर आहे. या शानदार आणि पावरफुल बाईक मध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून काही मोजकेच युनिट कंपनीकडून उपलब्ध केलेले आहेत.Ducati Panigale V4 ही एक रायडींग बाईक असल्यामुळे रायडींगला अनुकूल असे अनेक फीचर्स या बाईक मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे जसे की, कॉर्नरिंग ABS, स्लाईड कंट्रोल, लॉन्च कंट्रोल, तसेच द्विदिशात्मक क्विक शिफ्टर, ट्रॅक्शन कंट्रोल इत्यादी आधुनिक वैशिष्ट्ये बाईक मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
• Ducati Panigale V4 सस्पेन्शन आणि ब्रेक :
Ducati Panigale V4 ही आधुनिक युगातील रायडिंग स्टार बाईक पूर्णपणे ॲल्युमिनियम फ्रेम वर आधारित आहे. Ducati Panigale V4 समोर 43mm पूर्णपणे समायोज्य शोवा बिग पिस्टन फोर्क तसेच मागील बाजूस सुद्धा पूर्णपणे समायोजित करण्यायोग्य Sachs मोनोशॉक शोषकांसह सुसज्ज आहे.तसेच Ducati Panigale V4 मध्ये 43mm Ohlins NIX 30 USD फोर्क आणि Ohlins TTX36 मोनोशॉक मिळेल. ही युनिट्स कॉम्प्रेशन आणि रीबाउंड सेटिंग्जसाठी इलेक्ट्रॉनिक रीतीने समायोज्य आहेत तर नंतरच्या युनिटवर प्रीलोड करणे अद्याप मॅन्युअल प्रकरण आहे. ब्रेकिंग हार्डवेअर दोन्ही प्रकारांमध्ये ब्रेम्बोच्या स्टाइलमा मोनोब्लॉक कॅलिपर्ससह 330 मिमीच्या रोटर्सवर खाली बसलेल्या फ्रंट व्हीलसह सामान्य आहे. मागील बाजूस, तुम्हाला दोन-पिस्टन ब्रेम्बो स्लाइडिंग कॅलिपरसह 245mm डिस्क मिळते. सुपर ग्रिप्पी पिरेली डायब्लो सुपरकोर्सा एसपी रबर मानक राहते. तथापि, स्टँडर्ड व्हेरियंटला 5-स्पोक कास्ट ॲल्युमिनियम व्हील मिळतात आणि S व्हेरिएंट 3-स्पोक मार्चेसिनी बनावट ॲल्युमिनियम व्हीलवर रोल करते.
•हे पण वाचा 👇:
निष्कर्ष:
Ducati Panigale V4 ही एक-उच्च प्रदर्शन स्पोर्ट्स बाइक आहे, जी त्याच्या शक्तिशाली इंजिन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डीझाईनसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही एक अनुभवी रायडर असाल आणि तुम्हाला ट्रॅकवर किंवा उत्कृष्ट रायडिंग अनुभव हवा असेल, तर पॅनिगल V4 तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो.
अधिक माहितीसाठी तुमच्या स्थानिक डुकाटी डीलरशी संपर्क साधू शकता.
ही माहिती सामान्य माहिती आहे आणि ती तुमच्या विशिष्ट गरजेनुसार बदलू शकते. यासाठी तुम्ही तुमच्या स्थानिक डुकाटी डीलरशी संपर्क साधावा.
• Ducati Panigale V4 चे प्रतिस्पर्धी :
Ducati Panigale V4 ची प्रतिस्पर्धी BMW S 1000 R, Kawasaki Ninja ZX-10R आणि Honda CBR1000RR-R आहे.
• हे पण वाचा 👇: