Electric Vehicle : आगामी काळामध्ये सर्वात जास्त नोकऱ्या या इलेक्ट्रिक वाहन उद्योगात निर्माण होणार अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिलेली आहे.केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नागपूरच्या राजनगर स्थित राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय- एनएफएससी येथे ‘इलेक्ट्रिक वाहनातील आगीच्या दुर्घटनेचे व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत नितीन गडकरी बोलत होते. त्यावेळी त्यांनी असे सांगितले की येत्या आगामी काळात सर्वात जास्त रोजगार हे इलेक्ट्रिक वाहन उद्योगात निर्माण होतील.हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजी, इलेक्ट्रिक हे भविष्यातील इंधन आहे. या इंधनाच्या वापराने किफायतशीर व प्रदूषणमुक्त असे इंधन उपलब्ध होणार आहे. त्यानंतर नितीन गडकरी पुढे म्हणाले, लिथियमचे जगातील सुमारे ६ टक्के साठे हे जम्मूमध्ये सापडले. त्यामुळे हे लिथियम आयन बॅटरीच्या स्वरूपात ६० कोटी इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरण्यात येईल.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• हे पण वाचा 👇:
भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग हे २०३० पर्यंत सुमारे चार कोटी तरुणांना रोजगार देणारे क्षेत्र ठरेल, अशी माहिती केंद्री मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या क्षेत्रातून रोजगार कसा निर्माण होणार, त्याबाबतही गडकरी यांनी भाष्य केले. केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नागपूरच्या राजनगर स्थित राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय- एनएफएससी येथे ‘इलेक्ट्रिक वाहनातील आगीच्या दुर्घटनेचे व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत गडकरी बोलत होते. याप्रसंगी एनएफएससी नागपूरचे संचालक एन. बी. शिंगणे, उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, लिथियमचे जगातील सुमारे ६ टक्के साठे हे जम्मूमध्ये सापडले. त्यामुळे हे लिथियम आयन बॅटरीच्या स्वरूपात ६० कोटी इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरण्यात येईल.
• हे पण वाचा 👇:
• देशात सुमारे ३० लाख इलेक्ट्रिक वाहने Electric Vehicle नोंदणीकृत असून २०२३- २०२४ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये ४५ टक्के वाढ:
नितीन गडकरींनी पुढे असे सांगितले की, देशात सुमारे ३० लाख इलेक्ट्रिक वाहने नोंदणीकृत असून २०२३- २०२४ मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीमध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे. २०२४ मध्ये एकूण बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचे प्रमाण हे ६.४ टक्के आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये ५६ टक्के विक्रीचे प्रमाण हे इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये ४०० हून अधिक स्टार्टअप निर्माण झाले असून २०२५ पर्यंत हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या Electric Vehicle बाजारपेठेतील प्रमाण हे ८ टक्के पेक्षा जास्त होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
• हे पण वाचा 👇:
•e-Bike : धावत्या ई-बाईक मधून अचानक धुराचे लोट | बघता बघता घेतला पेट | जालना रोडवरील घटना|
• Electric Vehicle साठी हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजी, इलेक्ट्रिक हे भविष्यातील इंधन आहे. या इंधनाच्या वापराने किफायतशीर व प्रदूषणमुक्त असे इंधन:
Electric Vehicle :हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजी, इलेक्ट्रिक हे भविष्यातील इंधन आहे. या इंधनाच्या वापराने किफायतशीर व प्रदूषणमुक्त असे इंधन उपलब्ध होणार आहे. शेतातील तणस, परळी, ऊसाची मळी यापासून बायो सीएनजीच्या निर्मितीचे ४०० प्रकल्प मंजूर झाले असून त्यापैकी ६० प्रकल्प सध्या सुरू आहेत. भंडारा जिल्ह्यातही राईस हस्क पासून बायो सीएनजीचा प्रकल्प सुरू असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
• हे पण वाचा 👇: