Maruti Dzire: नमस्कार मित्रांनो, Maruti Dzire ही एक आकर्षक सेडान आहे. ही एक अशी कार आहे की, जिच्याबद्दल आपल्याला डबल डबल विचार करावा लागणार नाही. कारण नवीन Maruti Dzire हिचे जबरदस्त लुक, बेहतरीन फीचर्स, सोबतच दमदार आणि पावरफुल इंजिन, मायलेज इत्यादी सर्व बाबतीत Maruti Dzire कुठेही कमी पडत नाही. कमी किमतीमध्ये अनेक फीचर्स आणि सेवा सुविधा तसेच आराम ने भरपूर असल्यामुळे दररोजच्या वापरासाठी एक सामान्य ग्राहक म्हणून Maruti Dzire अनेक लोकांची पहिली पसंद आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• हे पण वाचा 👇:
Maruti Dzire च्या जुन्या मॉडेलमध्ये बऱ्याच प्रमाणात काही कमतरता दिसत होत्या, परंतु त्यानंतर आताच्या नवीन Maruti Dzire कंपनीने अनेक बदल केलेले आहेत त्यामुळे, त्याच कमी किमतीमध्ये आपल्याला आकर्षक आणि आरामदायक तसेच भरपूर फीचर्स ने लोडेड अशी एक मजबूत आणि मजेदार ड्रायव्हिंग चा अनुभव देणारी सेडान पाहायला मिळते. जर तुम्हाला सुद्धा Maruti Dzire बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्हीही माहिती फक्त तुमच्यासाठी चांगली आहे तेव्हा तुम्ही आमच्या सोबत शेवटपर्यंत जोडून राहा. आपण या आर्टिकल मध्ये Maruti Dzire ची परवडणारी किंमत, मायलेज, इंजिन आणि ट्रान्समिशन, सुरक्षा सुविधा,खास वैशिष्ट्ये तसेच Maruti Dzire च्या आकर्षक डिझाईन बद्दल चर्चा करणार आहोत.
• हे पण वाचा 👇:
•e-Bike : धावत्या ई-बाईक मधून अचानक धुराचे लोट | बघता बघता घेतला पेट | जालना रोडवरील घटना|
• Maruti Dzire चे आकर्षक डिझाईन :
2024 ची Maruti Dzire आधीच्या मॉडेल पेक्षा अधिक चांगली आणि आकर्षक आहे. आधीच्या स्टाईलिंग पेक्षा जरा हटके आणि आधीच्या पेक्षा रुंद लांब आणि आकर्षक आहे. आपल्याला येथे कलर सुद्धा एकदम फ्रेश आणि आकर्षक पाहायला मिळतात.गैलेंट रेड, एल्युरिंग ब्लू, नटमेग ब्राउन, ब्लूइश ब्लैक, आर्कटिक व्हाइट, मैग्मा ग्रे आणि स्प्लेंडिड सिल्वर हे सात कलर आपल्यासाठी उपलब्ध आहेत. यातील प्रत्येक कलर खास आणि आकर्षक असल्यामुळे नवीन Maruti Dzire ला अजूनही खास बनवतात.
• हे पण वाचा 👇:
त्याचप्रमाणे आपल्याला Maruti Dzire मध्ये LXi, VXi, ZXi आणि ZXi प्लस हे चार वरिएंट्स पाहायला मिळतात जे की प्रत्येकापेक्षा वेगळे आहेत. Maruti Dzire च्या आकर्षक डिझाईन बद्दल अजून काही सांगायचे झाल्यास, बाहेरून ही आकर्षक आणि प्रभावित वाटत असली तरी, आत मधले इंटेरियर स्वस्त आणि कमी प्रभावी वाटतात, कारण कंपनीने Maruti Dzire च्या आत मधील इंटेरियर डिझाईन वर तसेच कॉलिटी वर कमी खर्च केलेला आहे असेच म्हणता येईल.
बाकी ज्या काही बेसिक गोष्टी आहेत,जसे की इंजिन,मायलेज आणि डिझाईन याबद्दल कुठेही कमी नाही.
• हे पण वाचा 👇:
• Maruti Dzire चे पॉवरफुल इंजिन आणि ट्रान्समिशन :
इंजिन, मायलेज आणि फीचर्स मध्ये Maruti Dzire ला कंपनीने कुठे कमी केलेली नाही परंतु, आतील भाग मात्र थोडासा निराशाजनक वाटतो. उच्च गुणवत्ता वाले प्रॉडक्ट ऐवजी सस्ते वाले सामान आतील इंटेरियर साठी वापरण्यात आले आहे असेच वाटते. परंतु कमी किमतीमध्ये, रोजच्या वापरासाठी Maruti Dzire ही एक आरामदायक आणि मजबूत आहे.
• हे पण वाचा 👇:
Maruti Dzire च्या इंजिन बद्दल सांगायचे झाल्यास, आपल्याला इथे 1197 cc चे पावरफुल इंजिन मिळते जे की, 1.2-लीटर 3-सिलेंडर Z सीरीज पेट्रोल इंजन वापरलेले पाहायला मिळते. नवीन Maruti Dzire मध्ये पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही इंधन विकल्प आपल्याला दिलेले आहेत. हिचे पावरफुल इंजिन 69-80 bhp तसेंच 101.8 – 111.7 Nm चे टॉर्क जनरेट करते.
Maruti Dzire चे दोन्ही पावरफुल इंजिन हे 5- स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन किंवा 5- स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत जोडलेले आहे. इथे आपल्याला सीएनजीचा सुद्धा ऑप्शन मिळत असल्यामुळे ही सुद्धा एक चांगली बाब आहे. Maruti Dzire चे CNG पॉवरट्रेन 70 PS आणि 102 Nm चे आउटपुट देते.
• हे पण वाचा 👇:
• Maruti Dzire चे जबरदस्त माइलेज:
Maruti Dzire च्या maileage बद्दल पुढीलप्रमाणे :
- पेट्रोल MT – 24.79 kmpl
- पेट्रोल एएमटी – 25.71 किमी प्रति लीटर
- सीएनजी – 33.73 किमी/किलोग्राम
• Maruti Dzire ची खास वैशिष्ट्ये :
Maruti Dzire ही अनेक खास वैशिष्ट्यांनी लोडेड आहे. तिच्यामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळे खास वैशिष्ट्य पाहायला मिळतात जसे की , ऑटो एसी, एनालॉग ड्राइवर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर, क्रूज कंट्रोल, 9 इंच टचस्क्रीन, अँड्रॉइड ऑटो, एप्पल कार प्ले, तसेच अन्य खास वैशिष्ट्य आहेत. त्याचप्रमाणे Maruti Dzire ही भारतातील पहिली सबकॉम्पॅक्ट सेडान आहे, जे की सिंगल – पॅन – सुनरूफ सोबत येते. Maruti Dzire चे इंजिन आणि मायलेज सुद्धा जबरदस्त आहे. आकर्षक डिझाईन मुळे ती अजूनही खास दिसते.
• हे पण वाचा 👇:
• Maruti Dzire ची सुरक्षा सुविधा फीचर्स :
Maruti Dzire च्या अजून दुसरे फीचर्स मध्ये सुरक्षा सुविधांचा समावेश होतो जे की, या सुरक्षा सुविधांमध्ये आपल्याला 360 डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक्स स्थिरता नियंत्रण (ESC), सहा एअर बॅग, रियर पार्किंग सेन्सर यांचा समावेश आहे. तसेच Maruti Dzire ची खास बाब म्हणजे हिला सुरक्षा सुविधा देण्यामध्ये फाईव्ह स्टार मिळालेले आहेत. ग्लोबल NCAP द्वारा कार क्रॅश टेस्ट घेण्यात आलेल्या टेस्टमध्ये Maruti Dzire ला 5 स्टार रेटिंग मिळालेली आहे. वयस्कर प्रवाशांसाठी फाइव स्टार तर, लहान बालकांसाठी फोर स्टार Maruti Dzire ला देण्यात आलेले आहेत.
• हे पण वाचा 👇:
• Maruti Dzire ची परवडणारी किंमत /Price :
कमी किमतीमध्ये एक अतिशय चांगली आणि मजबूत अशी सेडान म्हणून Maruti Dzire चे नाव घेता येते. तिच्या किमती बद्दल सांगायचे झाल्यास Maruti Dzire ची price ही 6.79 लाख ते 10.14 लाखांपर्यंत आहे.
• Maruti Dzire चे मार्केटमधील प्रतिस्पर्धी :
Rivals :होंडा अमेज, हुंडई ऑरा और टाटा टिगोर हे नवीन Maruti Dzire चे प्रतिस्पर्धी म्हणून सांगता येतात.
• हे पण वाचा👇: