Ather 450X : आपण जर एखादी स्पोर्टी लूक वाली स्कुटी शोधत आहात तर, नवीन अपडेटेड गोष्टींसह Ather 450X मार्केटमध्ये आपल्या नवीन अवतारामध्ये दाखल झालेली आहे. मुलींना कॉलेजमध्ये जाताना स्कुटी न्यायला खूप आनंद होतो | शानदार परफॉर्मन्स आणि एकदम स्टायलिश लुक असेल तर मग खूपच मस्त | Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर आहे जिचा परफॉर्मन्स आणि लुक एकदम स्टायलिश आणि मजेदार आहे. Ather 450X भारतीय बाजारामध्ये अपडेटेड नवीन फीचर्स उपलब्ध आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Ather 450X मध्ये आधीच्या पेक्षा जास्त फीचर्स जोडले गेलेले आहेत ज्यामुळे ग्राहकांना त्याचा अधिक उपयोग करता येईल. आपल्याला सुद्धा Ather 450X बद्दल अधिक जानकारी माहिती करून घ्यायची असेल तर हा लेख फक्त तुमच्यासाठीच आहे. आम्ही या आर्टिकल मध्ये Ather 450X ची बॅटरी आणि मोटर परफॉर्मन्स, Ather 450X range, Features, price बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
• हे पण वाचा :
• Ather 450X शानदार डिझाईन :
Ather 450X एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जिची बॅटरी, मोटर, रेंज आणि फीचर्स एकदम मस्त आहेत. Ather 450X चा शानदार स्पोर्टी लुक ग्राहकांना आकर्षित करतो. इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंज मध्ये Ather 450X एकदम किफायती आणि स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर आहे. Ather 450X ही इलेक्ट्रिक स्कूटर आपल्याला 6 वेगवेगळ्या कलर्स मध्ये उपलब्ध आहे.एथर कॉसमॉस ब्लॅक, सॉल्ट ग्रीन, स्पेस ग्रे, स्टिल व्हाइट, ट्रू रेड आणि लुनर ग्रे.
Ather 450X शानदार बॉडी सह स्पोर्टी लुक देते. तिच्यासमोरच्या ऍप्रनवर आपल्याला शानदार एलईडी लाईटचा ऑप्शन उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचप्रमाणे हँडल वरच्या काऊलवर आपल्याला इंडिकेटर पाहायला मिळते. तसेच मागच्या बाजूला आपल्याला स्लिम टेल लाईट असलेली पाहायला मिळते. जिच्यामुळे Ather 450X चा स्टायलिश स्पोर्टी लुक कम्प्लीट होतो.
Ather 450X पावरफुल बॅटरी, मायलेज आणि परफॉर्मन्स :
Ather 450X भारतीय बाजारामध्ये नवीन अपडेटेड फीचर्स सह दाखल झालेली आहे. एकदम शार्प आणि पावरफुल इंजिन सोबत मायलेज पण खूप चांगला आहे .
• हे पण वाचा :
Ather 450X बॅटरी : या ठिकाणी आपल्याला 3.7kWh आणि 2.9kWh असे दोन बॅटरी पॅक चे ऑप्शन उपलब्ध आहेत. 3.7kWh प्रकार 150km ची दावा केलेली रेंज जनरेट करते. तर 2.9kWh प्रकार 111km ची प्रमाणित रेंज प्रदान करते. 3.7kWh ची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास आणि 45 मिनिटे घेते तर 2.9kWh ची बॅटरी 8 तास आणि 36 मिनिटांत चार्ज होते.
कंपनी कडून Ather 450X चा माईलेज 110 km असा महिन्यात आलेला आहे परंतु, वास्तविक पाहता याही पेक्षा जास्त मायलेज आपल्याला मिळतो. ग्राहक टेस्ट नुसार अशी माहिती मिळते की Ather 450X चा वास्तविक मायलेज 142 km चा मिळत आहे.
Ather 450X सोबत 3.3kW ची पॉवरफुल मोटर येते, जी 6.2 kW तसेच 26 Nm चा आउटपुट प्रदान करते. मिळालेल्या एका अधिकृत माहितीनुसार Ather 450X फक्त 3.3 सेकंदा मध्ये 0-40 km/h ची स्पीड पकडण्यास सक्षम आहे. स्कूटर ची स्पीड परफॉर्मन्स आणि मायलेज वास्तविक दुनियेमध्ये एकदम मस्त आहेत.
• हे पण वाचा :
• Ather 450X ब्रेक आणि सस्पेन्शन :
भारतीय बाजारात Ather 450X ही एक मॉर्डन , स्टायलिश आणि दमदार परफॉर्मन्स वाली बाईक म्हणून ओळखली जाते. Ather 450X एक मजबूत आणि आरामदायी बाईक आहे. Ather 450X च्या ब्रेक आणि सस्पेन्शन विषयी सांगायचे झाल्यास, ही बाईक ॲल्युमिनियम फ्रेम वर आधारित आहे, तिचे ब्रेक आणि सस्पेन्शन एकदम शानदार परफॉर्मन्स देतात. ब्रेकिंग सिस्टीम साठी 200 mm फ्रंट सिस्टीम आणि 190 mm रियल डिस्क सोबत स्टॅंडर्ड अवतारामध्ये कम्बाईन ब्रेकिंग सिस्टीम CBS पाहावयास मिळते.
त्याचबरोबर 12 इंचाचे अलॉय व्हील, ट्यूबलेस टायर, 153 mm चा ग्राउंड क्लिअरन्स, सीट ची एकूण उंची 780mm सोबत 3.7 kWh चा कर्ब वेट 111.6kg आहे. त्याचबरोबर 2.9 kWh वरिएंट चे वजन 108 kg आहे. एकूणच ब्रेक आणि सस्पेन्शन आपला परफॉर्मन्स दमदार आणि स्मूथ देतात. ब्रेक ची पकड एकदम पक्की आहे, टायर्स MRF प्रकारचे मजबूत आणि गुणवत्तापूर्ण आहेत. टायर्स ची पकड पण एकदम मजबूत आहे, स्कुटर चा एकूण वेट कमी असल्यामुळे स्कुटर चालवण्यास सोप्पी असून ट्रॅफिक मध्ये पण सहजतेने हॅन्डल करता येते.शहरामध्ये याचा ड्रायव्हिंग अनुभव अधिक चांगल्या प्रकारे मिळतो तर हायवेवर सुद्धा चांगले परफॉर्मस देतात.
• हे पण वाचा :
Ather 450X Features : (Ather 450X मधील खासियत ):
Ather 450X मध्ये आधुनिक फीचर्स पाहायला मिळतात. स्कुटर मध्ये IP65 रेटिंग वाली 7-इंच टचस्क्रीन कंसोल, अडपटिव्ह ब्राईटनेस वाली कलर्स स्क्रीन, गुगल मॅप, ब्ल्यू टूथ, 4ग LTE कनेक्टिव्हिटी, म्युजिक सिस्टिम चे फीचर्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला स्कूटर मध्ये चार राइडिंग मोड सुद्धा उपलब्ध आहेत: /स्मार्टइको, राइड, स्पोर्ट और वार्प, ज्यांचा वापर आपण रायडिंग करत असताना स्मार्ट रायडिंग साठी करू शकतो. त्याचप्रमाणे, फास्ट चार्जिंग सपोर्ट, ऑटो होल्ड, लोकेशन ट्रेकिंग, ट्रीप प्लॅनर, आणि OTA, ऑटो ऑफ इंडिकेटर, गाईड मी होम लाईट, डॉक्युमेंट स्टोरेज सारख्या अनेक सुविधा स्कूटरमध्ये दिलेले आहेत.
• Ather 450X ची अपेक्षित किंमत :
Ather 450X एक स्मार्ट फीचर्स वाली स्कूटर आहे देशामध्ये अनेक फीचर्स आपल्याला पाहायला मिळतात. मायलेज पण एकदम मस्त आहे. बॅटरी रेंज पावरफुल आहे. तर Ather 450X स्कूटरची भारतातील अपेक्षित किंमत 1.41 ते 1.55 लाख इतकी आहे. ( एक्स शोरूम, दिल्ली ). Ather 450X दोन वरिएंट मध्ये उपलब्ध आहे.2.9kWh व्हेरिएंटची किंमत 1,40,599 रुपये आहे आणि 3.7kWh बॅटरीची किंमत 1,54,999 रुपये आहे (दोन्ही एक्स-शोरूम बेंगळुरू). पहिल्या प्रकारात 3.7kWh बॅटरी क्षमता आहे आणि दुसऱ्यामध्ये 2.9kWh बॅटरी पॅक आहे.
• हे पण वाचा :
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.
Comments are closed.