MG ZS EV : शानदार लक्झरी फीचर्स आरामदायी इलेक्ट्रिक कार म्हणून MG ZS EV ची ओळख आहे. आपल्याला पण एखादी डेली यूज साठी, ऑफिशियल यूज साठी एखादी लक्झरी आणि थोडीशी महाग कार पहायची असल्यास MG ZS EV एक उत्तम पर्याय ठरू शकतो. नव्वदच्या दशकामध्ये खूप असे भारतीय लोक आपला दबदबा ठेवण्यासाठी महागड्या गाड्या वापरत असत. त्याचप्रमाणे अजूनही बरेचसे लोक बजेटमध्ये नसेल तरीही महागड्या गाड्या विकत घेण्यासाठी उत्सुक असतात. अशाच लोकांसाठी MG ZS EV एक प्रीमियम लुक असलेली आरामदायी इलेक्ट्रिक कार कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी मार्केटमध्ये उतरवली आहे. ही कार एक लक्झरी कार असून हिची बॅटरी क्षमता एकदम पावरफुल आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!आपल्याला जर MG ZS EV बद्दल अजून अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण या लेखांमध्ये शेवटपर्यंत आमच्या सोबत जोडून राहा. आम्ही हा लेख फक्त तुमच्यासाठीच आणलेले आहोत. आपण या आर्टिकल मध्ये MG ZS EV price, MG ZS EV features, seafty features, varients बद्दल अधिक जाणून घेणार आहोत.
• हे पण वाचा :
• MG ZS EV चा पावरफुल बॅटरी पॅक, इलेक्ट्रिक मोटर आणि रेंज :
MG ZS EV मध्ये आपल्याला पावरफुल बॅटरी पॅक पाहावयास मिळते त्यासोबतच MG ZS EV ची मोटर सुद्धा एकदम पावरफुल आणि शक्तिशाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि ग्राहकांच्या काही ड्रायव्हिंग टेस्ट अनुभवानुसार MG ZS EV ही चालवण्यास इतकी सोयीस्कर आहे की मोटर साऊंड अजिबात त्रासदायक नाही. बॅटरी रेंज पण एकदम मस्त आहे. इलेक्ट्रिक मोटर सुद्धा इतकी स्मूथ आहे की , ड्रायव्हिंग करत असताना तिचा कुठलाही आवाज किंवा त्रास चालकाला जाणवत नाही. त्यामुळे MG ZS EV एक आरामदायी आणि सुपर ड्रायव्हिंग अनुभव देते.
MG ZS EV ची पावरफुल आणि शक्तिशाली मोटर 50.3 kWh च्या पावरफुल बॅटरी सोबत जोडलेले आहे. जे की 177 PS ची जबरदस्त शक्ती आणि 280 Nm चा टॉर्क जनरेट करते.MG ZS EV च्या रेंज बद्दल सांगायचे झाल्यास MG ZS EV ची 461 ची रेंज आहे, जी की खूप चांगली आहे.
• हे पण वाचा 👉:
चार्जिंग:
7.4 kW AC चार्जर: 8.5 ते 9 तास (0 ते 100 टक्के)
50 kW DC फास्ट चार्जर: 60 मिनिटे (0 ते 80 टक्के)
• MG ZS EV ची खास आधुनिक वैशिष्ट्ये :
MG ZS EV आधुनिक फीचर्सनी लोडेड आहे. अनेक आधुनिक फीचर्स आणि सुविधा आणि सुसज्ज असलेली ही इलेक्ट्रिक कार येणाऱ्या नवीन पिढीसाठी सुद्धा आदर्श आहे. प्रीमियम लुक डिझाईन आणि लक्झरी कलर मुळे वेगळाच आनंद प्राप्त होतो. किंमत थोडी जास्त वाटत असली तरी अनेक ग्राहकांच्या हृदयात बसलेली इलेक्ट्रिक कार म्हणून MG ZS EV ला मानावे लागेल.
MG ZS EV ची खास वैशिष्ट्य म्हणजे 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मुळे चालकाला गाडी चालवताना अनेक प्रकारे उपयोगी होते , 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ आणि 6-वे पॉवर ड्रायव्हर सीट यांचा समावेश आहे. यात मागील एसी व्हेंट्ससह ऑटो एसी, पीएम 2.5 फिल्टर आणि 6-स्पीकर सेटअप देखील मिळतो ज्यामध्ये दोन ट्वीटर आहेत. SUV मध्ये कनेक्टेड कार टेक आणि वायरलेस फोन चार्जरचा ऑप्शन देखील दिलेला आहे.
• हे पण वाचा 👉:
• MG ZS EV मधील खास सुरक्षा सुविधा :
MG ZS EV आधुनिक सुरक्षा सुविधांनी सुसज्ज आहे. फीचर्स रेंज आणि बॅटरी क्षमता सुद्धा चालकासाठी एकदम आरामदायी आहे. भारतीय बाजारामध्ये MG ZS EV किमतीमध्ये थोडी जास्त वाटत असली तरी अनेक ग्राहकांची पसंत आहे.MG ZS EV आधीच किमतीमध्ये जास्त वाटत असून सुद्धा कंपनीने अजून काही वाढ केलेली आहे.
MG ZS EV माझी सुरक्षा सुविधाची माहिती करून घ्यायचे असल्यास या इलेक्ट्रिक कार मध्ये सहा एअरबॅग्ज , इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, 360-डिग्री कॅमेरा आणि हिल डिसेंट कंट्रोल यांचा समावेश आहे. MG अगदी लेन किप असिस्ट आणि डिपार्चर वॉर्निंग, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंगसह प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS) चा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व आधुनिक सुविधा आणि सुसज्ज असलेली ही इलेक्ट्रिक कार नक्कीच तुम्हाला आकर्षित करेल.
• हे पण वाचा 👉:
• MG ZS EV ची अपेक्षित किंमत :
महागड्या गाड्यांचा ज्यांना शौक आहे, जे लोक ऑफिसच्या वापरासाठी दररोजच्या येण्या जाण्यासाठी एक आरामदाय आणि कमी त्रासदायक इलेक्ट्रिक कार शोधू पाहत आहेत अशा लोकांसाठी MG ZS EV चा पर्याय एकदम योग्य ठरू शकतो.MG ZS EV ची किंमत रु. 18.98 लाख आणि रु. 25.44 लाख (एक्स-शोरूम पॅन इंडिया) आहे. कंपनीने MG ZS EV ची हिम्मत आधीच्या किमतीपेक्षा 25000 ने वाढवली आहे. ही एक गोष्ट ग्राहकांना थोडी त्रासदायक आहे.
• हे पण वाचा 👉:
• MG ZS EV रंग विकल्प आणि प्रकार:
MG ZS EV ग्राहकांना चार रंग पर्याय उपलब्ध करून देते :ग्लेझ रेड, अरोरा सिल्व्हर, स्टाररी ब्लॅक आणि कँडी व्हाइट.
MG ZS EV एक्झिक्युटिव्ह, एक्साइट प्रो, एक्सक्लुझिव्ह प्लस, एसेन्स आणि मर्यादित-रन 100 वर्षांची मर्यादित आवृत्ती, जी एक्सक्लुझिव्ह प्लस प्रकारावर आधारित आहे, अशा पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.
• MG ZS EV Rivals :
MG ZS EV च्या मुख्य प्रतिस्पर्धींमध्ये BYD Atto 3 आणि मारुती eVX आहे . हे Tata Nexon EV आणि Mahindra XUV400 EV ला सुद्धा प्रतिस्पर्धी मानता येते.
Comments are closed.