Mercedes-Benz Maybach GLS: मित्रांनो, जर आपण सुद्धा असा विचार करत असाल की, आपल्याकडे पण अशी एखादी लक्झरी कार असावी जी, इतरांपेक्षा हटके आणि वेगळे जीवन जगण्याचा मार्ग दाखवेल, आणि सामान्य विचार दूर ठेऊन हटके आणि इतरांपेक्षा वेगळी जीवनशैली जगण्याला महत्त्व देईल तर, Mercedes-Benz Maybach GLS ही लक्झरी कार आपल्यासाठी एक चांगला आणि उत्तम पर्याय बनू शकते. अतिशय जबरदस्त डिझाईन, लक्झरी वैशिष्ट्ये, किमतीत तशीच महाग , पॉवरफुल इंजिन आणि मायलेज या सर्व गोष्टींसोबत स्टायलिंग आणि लक्झरी जीवन यांचा चांगला संबंध म्हणजे Mercedes-Benz Maybach GLS होय. असे म्हणतात की आपण जसा विचार करतो, तसेच आपल्याला भेटत जाते. म्हणून मिडल क्लास विचार सोडून हाय क्लास विचार करायला काय हरकत आहे. मोठी स्वप्ने पाहिली तर ती पूर्ण करण्याचे मार्ग सुद्धा दिसतात. म्हणून आज आपण Mercedes-Benz Maybach GLS या लक्झरी कार विषयी अधिक माहिती घेणार आहोत.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!
• Mercedes-Benz Maybach GLS चे खास फीचर्स :
• वायरलेस फोन चार्जर: वायरलेस फोन चार्जर हे आत्ताच्या काळामध्ये अतिशय उपयोगी ते सर्वांनाच हवे आहे, जे की इथे मिळते.
• 4-झोन क्लायमेट कंट्रोल : 4 – झोन क्लायमेट कंट्रोल मुळे आपल्याला कार मधील वातावरणावर नियंत्रण मिळवता येते.
• ड्युअल इंटिग्रेटेड स्क्रीन सेटअप : कार मध्ये अनेक प्रकारे सहायता करते.
• पेनोरॅमिक सनरूफ : पॅनोरमिक सनरूफ मुळे आतील तसेच बाहेरील वातावरणाचा आनंद घेता येतो.
• लक्झरी साऊंड सिस्टिम : इथे आपल्याला 13-स्पीकर बर्मेस्टर साउंड सिस्टम मिळते, जी की आपल्या चांगल्या मूडमध्ये कधीच बाधा आणत नाही.
• Short Features :
Engine | 3982cc |
Power | 550bhp |
Tork | 770Nm |
Mileage | 10kmpl |
Seating Capacity | 5 Seater |
Price | 3.35 to 3.71 Cr. |
• Mercedes-Benz Maybach GLS इंजिन आणि परफॉर्मन्स जे वेगवान प्रवासा सोबत चांगल्या मायलेजचा दावा करते :
Mercedes-Benz Maybach GLS चे इंजिन जबरदस्त परफॉर्मन्स सोबत वेगवान प्रवासाचा दावा करते.
• Mercedes-Benz Maybach GLS 4 लिटर ट्वीन टर्बो व्ही 8 पेट्रोल इंजिनसह येते.
• हे पावरफुल इंजिन 557 PS ची शक्ती आणि 770Nm चे टॉर्क जनरेट करते. त्याचप्रमाणे हे इंजिन 48 व्ही माइल्ड- हायब्रीड सेटअप सोबत येते.
• त्याचप्रमाणे Mercedes-Benz Maybach GLS चे पॉवरफुल इंजिन हे 9- स्पीड ट्रान्समिशन सोबत येते. तसेच या लक्झरी कार मध्ये आपल्याला ऑल व्हील ड्राईव्हची सिस्टीम पाहायला मिळते.
• सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे पावरफुल आणि शक्तिशाली इंजिन फक्त 4.9 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग पकडू शकते.
• त्याचप्रमाणे ही लक्झरी अलिशान कार 10kmpl चे मायलेज देते.
• इंजिन बद्दल ग्राहकाची प्रतिक्रिया :
मित्रांनो तुम्हाला जर, इंजिन बद्दल रियल माहिती सांगायची असेल तर, एका ग्राहकाच्या प्रतिक्रिया वरून आपल्याला ती समजते. ते असे म्हणतात की, इंजिन खूप जबरदस्त असून वेगवान तसेच चांगल्या परफॉर्मन्सचा दावा करते आणि इंजिनचा आवाज येत नाही. तसेच मर्सिडीजचे हे ब्रँड अतिशय सर्वोत्तम असून एकदम हटके आणि लक्झरी आहे. जीवनामध्ये एकदा तरी याचा अनुभव घ्यायलाच हवा.
• Mercedes-Benz Maybach GLS ची सुरक्षा सुविधा:
सुरक्षा सुविधेमध्ये Mercedes-Benz Maybach GLS ने भरपूर काळजी घेतलेली असून सुरक्षा सुविधा किटमध्ये ग्राहकांना एअर बॅग ज्यामुळे समोरील तसेच मागील प्रवाशांना चांगलीच सुरक्षा सुविधा मिळते , त्यानंतर इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, लेनकीप असिस्ट, एडॉप्टिव क्रूज कंट्रोल, ऍटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, फॉरवर्ड कॉलिजन वॉर्निंग सारख्या सुरक्षा सुविधांचा समावेश होतो
• सुरक्षा किट बद्दल ग्राहकाची प्रतिक्रिया :
सुरक्षा किट बद्दल ग्राहकांची प्रतिक्रिया आलेली असून ते म्हणतात की, Mercedes-Benz Maybach GLS चा अनुभव अतिशय रोमांचकारी असून एक लक्झरी कारमध्ये यापेक्षा चांगले काही असू शकत नाही. भरपूर सेवा सुविधा आणि सुरक्षांचा विचार.
• Mercedes-Benz Maybach GLS ची किंमत जी विचार करायला भाग पाडते :

Mercedes-Benz Maybach GLS ही इस अलिशान आणि लक्झरी कार असून तिची किंमत करोडो मध्ये आहे. किती दिवस मिडल क्लास लाईफ जगायची, असा विचार करणाऱ्यांसाठी ही अलिशान कार एक वरदानच आहे. या आलिशान आणि लक्झरी कार च्या किमती बद्दल सांगायचे झाल्यास, 3.35 ते 3.71 कोटी मध्ये या कारची किंमत आहे.
तसेच ही लक्झरी SUV च्या व्हेरिएंट बद्दल सांगायचे झाल्यास GLS 600 4MATIC फक्त हे एकच व्हेरिएंट उपलब्ध असून संपूर्ण भारतभरात तिची किंमत 3.35 ते 3.71 एवढी आहे.
• Mercedes-Benz Maybach GLS वित्तीय मुभा:
या आलीशान कारवर आपल्याला वित्तीय मुभा सुद्धा मिळते. आपण ही आलिशान लक्झरी कार EMI वर सुद्धा बुक करू शकतो.
• 600 Night Series (Petrol) 4.26 करोड रुपये च्या आलिशान कार साठी EMI जर सांगायचा असेल तर, 1,01,50,000 एवढ्या डाऊन पेमेंट वर 9.8% बँक व्याज दराने तीन वर्षांच्या कालावधीसाठी आपल्याला 9,12,310 रुपयाचा मासिक ईएमआय पडतो.
• तसेच जर आपण प्रत्यक्ष शोरूम ला व्हिजिट केले तर, ते अधिक सोयीस्कर ठरेल. याप्रमाणे आपल्याला आपल्या वित्तीय सवलतीनुसार ही आलिशान कार बुक करता येईल.
( नोट :EMI चे आकडे ऑनलाइन काढलेले असून प्रत्यक्षात ते वेगळे असू शकतात. याची नोंद घ्यावी.)
• Mercedes-Benz Maybach GLS बद्दल ग्राहकांची प्रतिक्रिया :
आम्हाला ऑनलाईन मिळालेल्या ग्राहकांच्या प्रतिक्रियांवरून Mercedes-Benz Maybach GLS बद्दल खूप अभिमान वाटतो. ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या पुढील प्रमाणे :
• सर्वोत्तम अनुभव: गुलशन कुमार या नावाचे ग्राहक असे म्हणतात की, Mercedes-Benz Maybach GLS चा अनुभव हा सर्वोत्तम अनुभव असून, ही लक्झरी कार अतिशय जबरदस्त आहे आणि कारचे सर्वच फंक्शन्स आणि सेवा उच्च दर्जाची आहे.
• आतून आणि बाहेरून एक आलिशान कार : मधु नावाच्या या ग्राहकाने आपली प्रतिक्रिया दिलेली असून, ते असे म्हणतात की, ही एक अतिशय अलिशान कार आहे. तुम्हाला जर या कारमध्ये बसण्याची संधी मिळाली तर ती नक्कीच चुकवू नका. कारचा आतील अनुभव अतिशय सुखद आणि उच्च दर्जाचा आहे. ती तुम्हाला श्रीमंत बनवल्या सारखे वाटते. कार मध्ये बसल्यानंतर अंबानी सारखी फिलिंग येते.
Mercedes-Benz Maybach GLS, Mercedes-Benz Maybach GLS price,Auto news in Marathi,Automobile,Auto.
•:हे पण वाचा 👇:
•648cc इंजिन सोबत पहा Royal Enfield Shotgun 650 बाईकची किंमत, डिझाईन आणि वैशिष्ट्ये |
•नवीन वर्षात खरेदी करा TVS Apache RTR 310 बाईक आणि मिळवा खतरनाक माईलेज|पहा किंमत आणि फीचर्स|
•पैसा वसूल! Honda Unicorn बाईक | 60kmpl चे मायलेज आणि कौटुंबिक वापरासाठी एकदम जबरदस्त |पहा किंमत |
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.