Bajaj Pulsar 220: नमस्कार मित्रांनो, आपण जर एक अशी बाईक शोधत असाल जी की , आपल्याला दैनंदिन वापरासाठी एक मजबूत परफॉर्मन्स तसेच चांगले फीचर्स आणि मायलेज देईल. त्याचप्रमाणे आपली बजेटची सुद्धा चिंता दूर करेल, तर Bajaj Pulsar 220F बाईक खास आपल्यासाठीच आहे. ही बाईक अनेक वर्षांपासून ग्राहकांची सर्वच आवडती तसेच लोकप्रिय बाईक म्हणून मार्केटमध्ये आपले नाव कमावली आहे. Bajaj Pulsar 220F ही केवळ एक बाईक नसून ही आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाची चांगली पार्टनर आहे. या बाईचे शानदार मायलेज आणि पावरफुल इंजिन तसेच सर्व व्यावहारिक फीचर्स बाईकला खास बनवतात.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!चला तर मग पाहूया Bajaj Pulsar 220F ची बजेटमध्ये बसणारी किंमत, या बाईकचे व्यवहारिक फीचर्स, दमदार मायलेज आणि मार्केटमधील या बाईकचे प्रतिस्पर्धी.
• Bajaj Pulsar 220F ची बजेटमध्ये बसणारी किंमत :
Bajaj Pulsar 220F Price : जर आपण विचार करत असाल कि, Bajaj Pulsar 220F ही बाईक आपल्यासाठी बजेटमध्ये बसणारी आहे का? तर आपल्याला सांगण्यात आनंद होतो की, ही बाईक आपल्या बजेटमध्ये बसणारी आहे. या बाईक ची किंमत ही 1.39 लाख इतकी आहे. ( एक्स शोरूम ). दमदार फीचर्स सोबतच बाईकची मजबुती जबरदस्त असल्यामुळे बाईकला ग्राहकांची सर्वात जास्त मागणी आहे. जर आपल्याला बाईकची ही किंमत जास्त वाटत असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. कारण आपण कमीत कमी डाऊन पेमेंट वर तसेच कमीत कमी EMI च्या हप्त्यांवर ही बाईक खरेदी करू शकतात. त्यासाठी आपल्याला जवळच्या बजाजच्या शोरूम ला भेट देणे गरजेचे आहे.
• Bajaj Pulsar 220F चे दमदार ॲडव्हान्स फीचर्स :
Bajaj Pulsar 220F Features : बजाज पल्सर 220F बाईकच्या फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, या बाईचे फीचर्स दमदार आणि ऍडव्हान्स लेवलचे आहेत. बाईकच्या जबरदस्त परफॉर्मन्समुळे तसेच किफायती किमतीमुळे, बाईकची ग्राहकांकडून इतकी मागणी झाली की, बंद केलेल्या मॉडेलचे कंपनीला पुन्हा उत्पादन करावे लागले. या बाईक मध्ये काय खास आहे हे जर सांगायचे झाले तर, ही एक स्पोर्टी लुक असलेली दमदार आणि आरामदायी बाईक आहे.
Bajaj Pulsar 220F बाईक पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ने जोडलेली आहे. यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल आणि एसएमएस अलर्ट, टर्न बाय टर्न नेवीगेशन, LED टेल लॅम्प, डिजिटल इंडिकेटर, सिंगल चैनल ABS सिस्टीम, तसेच बाईक चालकास जबरदस्त रायडिंग पोझिशन साठी क्लिप- ऑन हँडल बार ची जोडी आहे.तसेच स्प्लिट सीट सेटअप आणि क्वार्टर फेअरिंग अप फ्रंट आहे ज्यामुळे बाईकचे रायडिंग आणि स्पोर्टी अपेक्षा पूर्ण होते.
• Bajaj Pulsar 220F इंजिन :
Bajaj Pulsar 220F Engine : बाईक चे 220cc सिंगल- सिलेंडर एअर कुल्ड, फ्युएल इंजेक्टेड इंजिन जबरदस्त हॉसपॉवरचा दावा करते. या बाईकचे इंजिन हे 5-स्पीड गिअरबॉक्स सोबत जोडलेले असून, इंजिन 8500rpm वर 20.4PS ची अश्वशक्ती आणि 7000rpm वर 18.55Nm चे टॉर्क जनरेट करते. फक्त पावरफुल इंजिनच नसून, बाईकचे मायलेज सुद्धा दमदार आहे. त्यामुळे आपण बिनधास्त रायडींग साठी दूरवर निघू शकता.
• Bajaj Pulsar 220F चे शानदार मायलेज :
Bajaj Pulsar 220F: मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास बजाज पल्सर 220 F ही बाईक शानदार मायलेज देते. 40 किलोमीटर / लिटरच्या दमदार मायलेज मुळे बाईक रायडर आरामात शहरात तसेच हायवेवर रायडिंग करू शकतो. त्याचप्रमाणे बाईकचे फीचर्स सुद्धा या बाईकला शोभणारे असून पावरफुल इंजिन मायलेज ला चांगली साथ देते.
• Bajaj Pulsar 220F चे सस्पेन्शन आणि ब्रेक :
Bajaj Pulsar 220F suspension & Breaks : बाईकच्या सस्पेन्शन आणि ब्रेक बद्दल सांगायचे झाल्यास बाईक मध्ये एक टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि ट्विन 5-स्टेप प्रीलोड-ॲडजस्टेबल गॅस-चार्ज केलेले शॉक शोषक आणि सिंगल-चॅनल ABS असलेली 280mm फ्रंट डिस्क आणि 230mm रीअर डिस्क यांचा समावेश आहे. त्याचे 17-इंच अलॉय व्हील्स 90-सेक्शन फ्रंट आणि 120-सेक्शन रियर ट्यूबलेस टायर्ससह गुंडाळलेले आहेत. त्याचप्रमाणे ट्यूबलेस टायर्स मुळे बाईकची सुरक्षा अजूनच वाढते.
• Bajaj Pulsar 220F चे Rivals :
Bajaj Pulsar 220F Rivals : बजाज पल्सर 220F चे त्याच श्रेणीतील मार्केटमध्ये प्रतिस्पर्धी सुद्धा आहेत. Royal Enfield Hunter 350, हिरो Xtreme 200S 4V , TVS Apache RTR 180 , Honda Hornet 2.0 यासारख्या जबरदस्त बाईक सोबत Bajaj Pulsar 220F प्रतिस्पर्ध्या करते.
Search : Bajaj Pulsar 220F, Bajaj Pulsar 220F Mileage, Bajaj Pulsar 220F Price,Bajaj Pulsar 220F Features, Engine, Rivals,2024 Bike News,Auto,Auto news in Marathi,fullautomobile. Bajaj Pulsar Bike.
• हे पण वाचा 👇:
•फक्त 4 हजार रुपयाच्या EMI वर घेऊन या 1.73 लाखाची TVS Ronin बाईक|226cc इंजिन सोबत दमदार मायलेज |
•110cc इंजिन सोबत launch झाली ऍडव्हान्स फीचर्स वाली TVS Scooty Zest 110 ची family स्कूटर |
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.