TVS Raider 125 On Road Price : नमस्कार मित्रांनो, TVS ने पुन्हा एकदा आपल्या दमदार कामगिरीने मोटर वाहन उद्योगात एक क्रांतिकारी बदल केलेला आहे | सामान्य ग्राहकाला सुद्धा परवडेल अशा किमतीमध्ये TVS Raider 125 बाईक मार्केटमध्ये उतरवली आहे. ही बाईक आपल्या दमदार मायलेज मुळे तसेच जबरदस्त पिकप मुळे मार्केटमध्ये धूम केली आहे. कुठल्याही ग्राहकाला बाईक खरेदी करत असताना, अपेक्षा असते की ती बाईक एक मजबूत, पावरफुल तसेच शानदार मायलेज देणारी असावी. या सर्व अपेक्षा TVS Raider 125 पूर्ण करते. TVS Raider 125 ची On Road Price सुद्धा कुठल्याही ग्राहकाला परवडणारी आहे. त्यामुळे जर आपण नवीन वर्षांमध्ये ही बाईक खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, ही एक चांगली नवीन वर्षातील गुंतवणूक ठरू शकते.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!मला तर मग मित्रांनो पाहूया, TVS Raider 125 On Road Price, Features, Engine, Mileage बद्दल अधिक माहिती.
• सामान्य ग्राहकाला परवडणारी TVS Raider 125 On Road Price:
सर्वात आधी आपण TVS Raider 125 On Road Price विषयी चर्चा करूया. कारण कुठलाही ग्राहक कुठली वस्तू किंवा काहीही खरेदी करायची असो, त्यासाठी तो सर्वात आधी आपली बजेट पाहतो. TVS Raider 125 चे बजेट सुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे. साठी आपण जास्त वेळ न घेता या बाईकची किंमत पाहूया. किमती बद्दल सांगायचे झाल्यास TVS Raider 125 ही बाईक 85 हजार ते एक लाखांपर्यंत आहे.
त्याचप्रमाणे ऑन रोड किंमत TVS Raider 125 On Road Price सांगायची झाल्यास, ही वेगवेगळ्या शहरासाठी थोड्याफार प्रमाणात बदलत असते, आणि किंमत तेवढीच असते. त्यामुळे जर आपण ही बाईक खरेदी करण्याच्या विचारात असाल आणि आपल्याला बजेट ची चिंता वाटत असेल तर चिंता करण्याची काही गरज नाही. कारण आपण ही बाईक EMI वर सुद्धा खरेदी करू शकतो. कमीत कमी डाऊन पेमेंट आणि चांगल्या सोप्या EMI च्या हप्त्यांवर आपण ही बाईक खरेदी करू शकतो.
TVS Raider 125 ही बाईक सहा प्रकारांमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे प्रत्येक प्रकारासाठी किंमत ही वेगवेगळी आहे. आपण आपल्या बजेटनुसार आपला व्हेरियंट निवडू शकतो.
सर्वात आधी बेस ड्रम ब्रेक व्हेरियंटची आहे. या व्हेरियंटची किंमत 85,010 रुपये आहे, त्यानंतर सिंगल-सीट डिस्क व्हेरिएंटची किंमत 96,010 रुपये आहे आणि स्प्लिट-सीट डिस्क व्हेरिएंटची किंमत 97,850 रुपये आहे. तसेच नवीन iGO व्हेरिएंट चा समावेश करण्यात आलेला आहे, आणि या व्हेरियंटची किंमत 98,530 रुपये इतकी आहे.
• TVS Raider 125 मध्ये मिळणारे फीचर्स :
शक्तिशाली इंजिन तसेच जबरदस्त फीचर्स मुळे TVS Raider 125 बाईक अनेक युवकांची आवडती बाईक आहे. मायलेज बद्दल तर सांगायलाच नको कारण, या बाईकचे मायलेज इतके जबरदस्त आहे की, TVS Raider 125 ला आपण कधीही लांबच्या प्रवासासाठी प्लॅन करू शकतो.
त्याचप्रमाणे या बाईक मध्ये मिळणाऱ्या फीचर्स ची चर्चा करायची असल्यास, बाईकमध्ये स्पीडोमीटर, ॲडोमीटर, ट्रिप मीटर यासारखी डिजिटल फीचर्स मिळतातच त्यासोबतच, गिअर पोझिशन इंडिकेटर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, हवामानाबद्दल ची नवीन माहिती देणारे फीचर्स सुद्धा जबरदस्त आहे.
त्याचप्रमाणे व्हॉइस असिस्ट, मायलेज इंडिकेटर, कलर LCD आहे. बाईक रायडर च्या फोन चार्जिंग साठी यूएसबी पोर्ट, बाईक सायलेंट स्टार्टर, इंजिन कट ऑफ फंक्शन, साईड स्टॅन्ड इंडिकेटर, बाईक स्टार्ट स्टॉप सिस्टीम, तसेच बाईक मध्ये तीन रायटिंग मोड सुद्धा मिळतात, इको, स्पोर्ट आणि रायडींग मोड. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बाईक संपूर्णपणे LED सेटअप ने सुसज्जित असलेली पाहायला मिळते.
आपल्याला वरील सर्व फीचर्स पाहून लक्षात आलेच असेल की, बाईक मध्ये किती शानदार फीचर्स आहेत आणि बाईक किती जबरदस्त आहे. सर्व शानदार फीचर्स अगदी बजेटमध्ये बसणाऱ्या किमतीमध्ये आपल्याला मिळतात.
• TVS Raider 125 चे शक्तिशाली इंजिन:
TVS Raider 125 च्या शक्तिशाली इंजिन बद्दल सांगायचे झाल्यास, फक्त 6.23 सेकंदामध्ये ही बाईक 0 ते 60kmph चा जबरदस्त पिकअप देते. यावरून लक्षात येते कि बाईक किती शक्तिशाली आहे. TVS Raider 125 बाईक चे इंजिन हे 125cc चे आहे, जे कि 11.38PS ची शक्ती आणि 11.2Nm चे टॉर्क जनरेट करते. TVS ने नेहमीच ग्राहकांचा विचार करून आपले वाहन मार्केट मध्ये उतरवले आहे. त्याप्रमाणे TVS Raider 125 ही जबरदस्त बाईक बजेट मध्ये बसणारीच आहे, परंतु तिचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही बाईक दैनंदिन वापरासाठी सुद्धा एकदम धाकडं आहे.
• TVS Raider 125 चे मायलेज:
मायलेज बद्दल तर काय सांगावे, TVS Raider 125 चे मायलेज इतके जबरदस्त आहे की, या बाईकला आपण लांबच्या प्रवासासाठी कधीही प्लॅन करू शकतो. TVS Raider 125 चे सरासरी मायलेज हे 72 किलोमीटर / लिटर इतके जबरदस्त आहे. एवढी शानदार मायलेज तर तुलना केल्यास इतर कुठल्याही बाईक मध्ये मिळणार नाही. मिळाले तरीही इतक्या कमी बजेटमध्ये मिळणाऱ्या बाईक मध्ये एवढे चांगले मायलेज मिळणे अशक्यच आहे. त्यातल्या त्यात ही एक स्पोर्ट कम्प्युटर बाईक असून एवढे जबरदस्त मायलेज देते.
• TVS Raider 125 हाताळण्यासाठी सोपी:
TVS Raider 125 ही बाईक हाताळण्यासाठी अतिशय सोपी आहे. 125cc च्या शक्तिशाली इंजिन सोबत बाईकचे कर्ब वजन हे फक्त 123 किलो इतके आहे. त्यामुळे मोठ्या कदच्या बाईक चालकासाठी तसेच, छोटे कद असणाऱ्या बाईक चालकासाठी सुद्धा ही बाईक चांगली हाताळता येते. त्याचप्रमाणे बाईकचे ट्यूबलेस टायर बाईकला चांगली सुरक्षा पुरवतात. बाईकचा चांगला वेग आणि आरामदायी रायडींग मुळे प्रवास करण्यासाठी पण चांगले आहे.
TVS Raider 125 बाईक चे फक्त परफॉर्मन्सच चांगले नाही तर,अनेक दृष्टीने बाईक अतिशय उत्तम आहे. बाईक मध्ये मिळणारे फीचर्स तर इतके जबरदस्त आहेत का, त्यांची एक लिस्टच येते. उत्तम ब्रेक सिस्टीम, ट्यूबलेस टायर, सेफ्टी, गिअर पोझिशन या सर्व बाबतीमध्ये बाईक अतिशय उत्कृष्ट आहे.
• TVS Raider 125 मध्ये मिळणारे रंग पर्याय :
TVS Raider 125 आठ रंगांमध्ये उपलब्ध आहे. वेगवेगळ्या व्हेरियंटसाठी वेगवेगळा रंग पर्याय मिळतो. स्ट्राइकिंग रेड आणि विकेड ब्लॅक, फोर्झा ब्लू, फायरी यलो आणि विक्ड ब्लॅक शेड्स, स्ट्राइकिंग रेड आणि ब्लेझिंग ब्लू कलर स्कीम, iGO व्हेरियंटला लाल मिश्र धातुसह नार्डो ग्रे कलर स्कीम मिळते.
• TVS Raider 125 च्या किमतीमध्ये आपण दुसरी कुठली बाईक खरेदी करू शकतो का?
नक्कीच! TVS Raider 125 च्याच किमतीमध्ये तसेच श्रेणीमध्ये आपण दुसरी बाईक सुद्धा खरेदी करू शकतो. TVS Raider 125 ला टक्कर देणारी बाईक म्हणजे, Hero Xtreme 125R ही सर्वात आधी येते. त्यानंतर Honda Shine 125, Bajaj Pulsar N125 आणि Hero Glamour या बाईकचा पर्याय सुद्धा आपण निवडू शकतो.
Contain:TVS Raider 125,TVS Raider 125 On Road Price,TVS Raider 125 Mileage,Features,Engine,Rivals,2024 Bike News,Bike News,Auto,Auto news in Marathi,Fullautomobile.TVS Bike.,
• हे पण वाचा 👇:
•फक्त 4 हजार रुपयाच्या EMI वर घेऊन या 1.73 लाखाची TVS Ronin बाईक|226cc इंजिन सोबत दमदार मायलेज |
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.