2025 Honda Activa: नमस्कार मित्रांनो, नुकतेच 2025 चे 2025 Honda Activa हे नवीन मॉडेल अनेक फीचर्ससह दमदार मायलेज आणि पावरफुल इंजिन सोबत लॉन्च करण्यात आलेले आहे. 2025 या नवीन वर्षात जर आपण एखादी दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी मजबूत आणि किफायत शीर स्कूटर शोधत असाल, जी कमी किमतीमध्ये चांगले परफॉर्मन्स देईल तसेच अवरेज सुद्धा चांगले देईल तर या वर्षातील होंडाची जबरदस्त स्कूटर म्हणून 2025 Honda Activa ही स्कूटर विचारात घेण्यास काहीही हरकत नाही. आम्हाला आपल्याला सांगण्यात आनंद होतो की, Honda Activa स्कूटर ही भारतातील सर्वाधिक विक्री होणारी तसेच सर्वात लोकप्रिय स्कूटर म्हणून नावाजलेली आहे. दुचाकी वाहनाच्या दुनियेत होंडा ने क्रांतिकारी पाऊल टाकलेले आहे. त्यामुळे स्कूटर प्रेमींसाठी तसेच दुचाकी उत्साही लोकांसाठी ही स्कूटर एक उत्तम पर्याय ठरते.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!जर आपल्याला बजेटमध्ये बसणाऱ्या किमतीत, आकर्षक डिझाईन, मजबुती, टिकाऊपणा, चांगले फीचर्स, पावरफुल इंजिन तसेच चांगले मायलेज देणारी स्कूटर खरेदी करण्याचा विचार असेल तर नवीन 2025 Honda Activa स्कूटर बद्दल आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. चला तर मग पाहूया या स्कूटर बद्दलची अधिक माहिती.
• हे पण वाचा 👇:
•नवीन Yamaha RX 100: खास फीचर्स आणि किंमत|
• 2025 Honda Activa चे फीचर्स :
नवीन वर्षातील नवीन आणि दमदार स्कूटर म्हणून 2025 Honda Activa हे स्कूटर एकदम जबरदस्त आहे. नवीन आणि मॉडर्न युगाशी, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित, डिजिटल दुनियेततील या स्कूटर मध्ये आपल्याला ऍडव्हान्स फीचर्स पाहायला मिळतात.
जसे की, 2025 Honda Activa या स्कूटरचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल TFT स्क्रीन, त्यानंतर LED हेडलाईट, सायलेंट स्टार्टर, इंजिन कील स्विच, Honda RoadSync या ॲपला समर्थन देणारे वैशिष्ट्य मुळे स्कूटर चालकास कॉल आणि एसएमएस अलर्ट विषयी माहिती मिळते, त्याचप्रमाणे सध्याच्या युगामध्ये सर्वांना आवश्यक असणारे मोबाईल चार्जिंग पोर्ट जे की सी टाईप चे मिळते हे सुद्धा एक खास फीचर जबरदस्त आहे. त्याचप्रमाणे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, 4.2 टीएफटी डिस्प्लेसह अनेक खास वैशिष्ट्य आपल्याला या स्कूटरमध्ये मिळतात.
• 2025 Honda Activa इंजिन :
नवीन 2025 Honda Activa मध्ये सिंगल- सिलेंडर 109.51cc चे पावर फुल इंजिन मिळते. त्याचप्रमाणे हे पावरफुल इंजिन नवीन OBD2B उत्सर्जन मानकाशी सुसंगत आहे. 7.99 PS ची शक्ती आणि 9.05 Nm चे टॉर्क जनरेट करण्यात हे सक्षम आहे. नवीन 2025 Honda Activa चे इंजिन चांगली शक्तीच जनरेट करते असे नाही तर, उत्तम मायलेज आणि चांगले परफॉर्मन्स देण्यामध्ये सुद्धा हे स्कूटर मागे नाही.
• 2025 Honda Activa मायलेज :
जबरदस्त डिजिटल फीचर्स, पॉवरफुल इंजिन ने समर्थित असलेली मोटर, आकर्षक आणि युनिक डिझाईनसह बजेटमध्ये बसणाऱ्या किमतीमध्ये, 2025 Honda Activa हे नवीन वर्षातील स्कूटर नवीन अपडेटसह नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे. या नवीन स्कूटर मध्ये आपल्याला अनेक दमदार फीचर्स मिळतातच परंतु, मायलेज सुद्धा जबरदस्त मिळते. 2025 Honda Activa स्कूटर हे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 55kmpl ते 60kmpl इतके दमदार मायलेज देते. त्यामुळे आपण रायडिंग साठी या स्कूटरला सहजतेने हाताळू शकतो.
• हे पण वाचा 👇:
•फक्त 4 हजार रुपयाच्या EMI वर घेऊन या 1.73 लाखाची TVS Ronin बाईक|226cc इंजिन सोबत दमदार मायलेज |
• 2025 Honda Activa ची किंमत :
नवीन तसेच नुकतेच लॉन्च केलेल्या 2025 Honda Activa ची किंमत ही कुठल्याही ग्राहकाला परवडणारी आहे. नवीन 2025 Honda Activa स्कूटर TFT डिस्प्लेसह अपडेट करण्यात आलेले असून स्कूटर मध्ये आपल्याला स्टँडर्ड, DLX आणि H-Smart हे हे तीन जबरदस्त धाकड व्हेरियंट पाहायला मिळतात. स्कूटर च्या बेस मॉडेलची सुरुवात ही 80 हजार 950 रुपये पासून होते. (एक्स शोरूम ). आपल्या दमदार कामगिरीमुळे तसेच ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीमुळे हे स्कूटर भारतातील सर्वाधिक विक्री होणारे तसेच सर्वात लोकप्रिय स्कूटर म्हणून मार्केटमध्ये प्रसिद्ध आहे.
• 2025 Honda Activa चे रंग पर्याय :
नवीन 2025 Honda Activa स्कूटर मध्ये सहा रंग पर्याय निवडले जाऊ शकतात. पर्ल प्रेशियस व्हाइट, डिसेंट ब्लू मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक, रिबेल रेड मेटॅलिक आणि पर्ल सायरन ब्लू. हे सर्व रंग आकर्षक रंगामध्ये उपलब्ध असून ग्राहकांना आपल्या आवडीचा रंग पर्याय निवडण्याचा पर्याय उपलब्ध होतो.
• 2025 Honda Activa च्या किमतीमध्ये दुसरी कोणती स्कूटर खरेदी करता येऊ शकते?
2025 Honda Activa च्या किमती मध्येच आपल्याला दुसरी स्कूटर खरेदी करता येऊ शकते, त्यामध्ये सर्वात आधी TVS Jupiter, Hero Pleasure Plus आणि TVS Scooty Zest यांचे नाव घेता येते. म्हणजेच 2025 Honda Activa च्या समान किमतीमध्ये आणि समान श्रेणीमध्ये या स्कूटर चा समावेश होतो. त्याचप्रमाणे Honda Dio आणि Hero Xoom 110 हे दोन स्पोर्टियर स्कूटर सुद्धा नवीन 2025 होंडा एक्टिवा च्या श्रेणी मध्येच येतात. त्यामुळे यांचा सुद्धा विचार करता येऊ शकतो.
2025 Honda Activa, 2025 Honda Activa Launch, 2025 Honda Activa Price,2025 Honda Activa Features, Images, Mileage,2024 Bike News,2025 bike news,Fullautomobile,Auto,Auto news in Marathi,Automobile. Bike News.
• हे पण वाचा 👇:
•KTM RC 390 Modified बाईक का आहे Best Sport Bike?
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.