123km रेंज वाली Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटर|मासिक EMI फक्त 3,022 रुपये |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ather Rizta : नमस्कार मित्रांनो, 123km च्या जबरदस्त रेंज सोबत फक्त 3,022  रुपयांच्या  मासिक EMI ने Ather Rizta ही जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर आपण आता घरी घेऊन येऊ शकतो. मोटर वाहन उद्योगांमध्ये अनेक  मोठमोठ्या कंपन्या आपले इलेक्ट्रिक वाहन मार्केटमध्ये उतरवत आहेत. परंतु जर आपल्याला बजेटमध्ये बसणाऱ्या किमतीमध्ये, तसेच चांगले व्यवहारिक फीचर्स, डिझाईन आणि, दैनंदिन वापरासाठी योग्य असे स्कूटर हवे असेल तर, Ather Rizta हे स्कूटर आपल्या अपेक्षेप्रमाणे  अनेक फीचर्स आणि  अपेक्षा पूर्ण करू शकते. तेव्हा कमीत कमी डाऊन पेमेंट आणि कमीत कमी मासिक EMI प्लॅनवर आपण ही इलेक्ट्रिक स्कूटर घरी घेऊन येऊ शकतो. जाणून घेऊया  Ather Rizta विषय अधिक माहिती.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Ather Rizta

Ather Rizta मध्ये अनेक ऍडव्हान्स खास फीचर्स मिळतात जसे की, संपूर्ण इलेक्ट्रिक स्कूटर ही  LED लाईटने सुसज्जित आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण स्कूटर ही डिजिटल फीचर्सनी लोडेड असून गुगल मॅप,नेव्हिगेशन, इंटिग्रेटेड whatsapp आणि alexa, फोल्ड करता येण्यासारखे पिलियन फुटरेस्ट, हिल होल्ड असिस्ट, स्मार्ट इकोमोड, रिवर्स मोड, 7 इंच LCD स्क्रीन, कलरफुल  TFT स्क्रीन यासारखे अनेक खास फीचर्स Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये मिळतात.

Ather Rizta या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये आपल्याला  रंग पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. बेस Rizta S तीन मोनोटोन रंगांमध्ये ऑफर केला जातो: सियाचेन व्हाइट, डेक्कन ग्रे आणि पँगॉन्ग ब्लू.

Rizta Z सात रंगांमध्ये उपलब्ध आहे,  ज्यात 3 मोनोटोन आणि 4 ड्युअल-टोन रंगांचा समावेश आहे: सियाचीन व्हाइट, डेक्कन ग्रे, पँगॉन्ग ब्लू, डेक्कन ग्रे ड्युअल-टोन, पँगॉन्ग ब्लू ड्युअल-टोन, वेलची हिरवा आणि अल्फोन्सो यलो.

आकर्षक रचनेच्या बाबतीत  Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटर एक  युनिक आणि जबरदस्त रचनेसह येते. सुरक्षित आणि कॉलिटी  MRF Zapper-N टायर्ससह हे इलेक्ट्रिक स्कूटर सुसज्ज आहे. स्कूटरमध्ये संपूर्ण  LED स्क्रीन, डिजिटल फीचर्स, ऍलोय व्हील, तसेच आकर्षक रंग, स्कूटर लांब रुंद तसेच  चांगली 780mm ची सीट येते, ज्यामुळे स्कूटर चालकास प्रवासाचा अनुभव मिळते. तसेच स्कूटरचे कर्ब वजन हे  119kg इतके असून, बुटक्या तसेच मोठ्या स्कूटर चालकास सुद्धा ही स्कूटर चालवण्यासाठी सोपी आहे. ब्रेकिंग सिस्टीम सुद्धा उत्तम आहे. त्याचप्रमाणे  1285mm चे व्हीलबेस, तसेच बजाज चेतक पेक्षा हाताळण्यासाठी सोपे आहे.

Ather Rizta Top Speed

बजाज चेतक च्या तुलनेत  हाताळण्यासाठी सोपे असलेले  Ather Rizta चे इलेक्ट्रिक स्कूटर 80kmph ची टॉप स्पीड देते. त्यामुळे स्कूटर दैनंदिन वापरासाठी , ऑफिशियल कामासाठी आणि लांबच्या प्रवासासाठी सुद्धा वापरता येऊ शकते. त्याचप्रमाणे Ather आपल्या कार्यक्षमता आणि सुरक्षिततेमुळे शहरातील प्रवासासाठी  सुलभ हाताळणीस उत्तम आहे. 165mm च्या ग्राउंड क्लियरन्ससह  स्कूटर रस्त्यावर अडथळ्यांना मात करण्यासाठी अतिशय मजबूत आहे.

Ather कंपनीने नवीन वर्षामध्ये  Ather Rizta च्या किमतीमध्ये वाढ केलेली असून, या स्कूटरची भारतात शोरूम किंमत ही 99 हजार 999 ते 1.39 लाख इतकी आहे.( एक्स शोरूम बेंगळुरू ).

त्याचप्रमाणे, Ather Rizta हे तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून Rizta S आणि Rizta Z, दोन्ही 2.9kWh च्या बॅटरी पॅकने सुसज्ज आहेत ज्यात 123 किमीची श्रेणी आहे आणि रिझ्टा Z 3.7kWh बॅटरी पॅक प्रदान करते. 159 किमीची उच्च श्रेणी. Rizta S साठी 1,09,999 रुपये, Rizta Z 2.9kWh साठी 1,26,499 रुपये आणि Rizta Z 3.7kWh साठी रुपये 1,46,499 इतक्या किमती आहेत. ( सर्व किमती एक्स शोरूम बेंगळुरू ).

Ather Rizta EMI Plan

Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटर ला आपण  चांगल्या मासिक EMI प्लॅन ने सुद्धा खरेदी करू शकतो. फक्त 3,022 रुपयाच्या  मासिक EMI ने आपण ही स्कूटर घरी घेऊन येऊ शकतो.

Ather Rizta च्या S व्हेरियंट साठी 1,05,057 या किमतीसाठी  फक्त 15 हजार रुपयांच्या डाऊन पेमेंट वर 9.7% बँक व्याज दराने तीन वर्षाच्या कालावधीसाठी आपण  2,893 रुपयाच्या मासिक EMI वर आपण ही इलेक्ट्रिक स्कूटर घरी घेऊन येऊ शकतो.

तसेच, ही आकडेवारी ऑनलाईन पद्धतीने काढलेली असल्यामुळे शोरूमच्या किमतीमध्ये आणि ईएमआय च्या आकड्यांमध्ये फरक असू शकतो. त्यामुळे शोरूम ची आकडेवारीच गृहीत धरण्यात यावी.

Ather Rizta ही एक फॅमिली स्कूटर असून ती Honda Activa 125, Suzuki Access 125 आणि TVS Jupiter 125, Ampere Nexus, TVS iQube, Ola S1 Air, Hero Vida V1 Pro आणि बजाज चेतक यांची प्रतिस्पर्धी आहे.

• हे पण वाचा 👇:

130kmph च्या टॉप स्पीड ची Honda Hornet 2.0 बाईक साठी EMI फक्त 4,788 रुपयांचा|पहा किंमत|

नवीन Hero Destini 125: आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्ससह!

Retro Bike: क्लासिक लूक आणि  क्रोम फिनिशिंग वाली बाईक फक्त 1 लाखात|पहा माइलेज सोबत फीचर्स|

105kmph च्या टॉप स्पीड सोबत 212km/चार्ज ची जबरदस्त रेंज|मात्र कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये घेऊन या Simple One इलेक्ट्रिक स्कूटर |

मात्र 2,700 रुपयाच्या मासिक EMI वर घेऊन या 124cc च्या पॉवरफुल इंजिन वाली Suzuki Access 125 स्कूटर |


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.