e-Bike : आत्ताच्या वाढत्या महागाईच्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडत आहेत. त्यामुळे सामान्य लोकांना दररोजच्या वापरासाठी पेट्रोल डिझेलच्या किमती परवडणाऱ्या नाहीत. म्हणून अनेक लोक ई-वाहन खरेदी करत आहेत. परंतु ई-वाहनाबद्दल अनेक दुर्घटना पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील धावत्या ई बाईकने अचानक पेट घेतला. परंतु e-Bike चालक आणि रस्त्यावरील बाजूच्या चालकांनी वेळेत सावधगिरी बाळगल्यामुळे दुर्घटना टळली.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• हे पण वाचा :
• छत्रपती संभाजी नगर मधील जालना रोडवर घडली घटना :
e-Bike : जालना रोड ने सिडको कडून शहरात जाणाऱ्या e-Bike मधून अचानक धूर निघत असल्यामुळे पाठीमागील वाहन चालकाने e-Bike चालकास हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर त्या e-Bike चालकाने लगेचच आपली बाईक रस्त्याच्या बाजूला लावली. त्यानंतर अग्निशामन दलाच्या जवानांनी तासभर पाण्याचा मारा केल्यानंतर हा धूर बंद झाला. ही घटना घडत असताना बघणार यांची गर्दी झाल्यामुळे थोडा वेळ तिथे वाहतूक कोंडी सुद्धा झाली.
• हे पण वाचा :
• अग्निशमन दलाच्या जवानांनी तासभर केला पेटत्या e-Bike वर पाण्याचा मारा :
e-Bike : धावत्या e-Bike चा धूर निघत असल्यामुळे ई बाईक चालक रस्त्याच्या बाजूला बाईक घेतल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केला त्यामुळेच ही बाईकचा धूर बंद झाला. कचनेर जवळील वरवंडी गावातील शेतकरी दोघे भाऊ पाण्याचा पाईप खरेदीसाठी ई-बाईकने शहराकडे येत होते. हायकोर्ट सिग्नल लागल्याने ते थांबले. त्यावेळी पाठीमागील वाहन चालकाने बाईक मधून धूर निघत असल्याचे लक्षात आणून दिले त्यावेळी त्या ई बाईक चालकांनी आपली बाईक रस्त्याच्या बाजूला लावून दिली. त्यानंतर त्या बाईक चालकांनी त्या ही बाईक वर दोन पाण्याचे जार ओतले,पण धूर काही थांबत नव्हता.
• हे पण वाचा :
त्यानंतर त्या e-Bike चा स्फोट होतो की काय असेच वाटत होते.त्यामुळे रस्त्यावरील एका व्यक्तीने फोमचे सिलेंडर घेऊन येऊन ई- बाईकचा धूर विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही धूर काही कमी होत नव्हता. त्यामुळे अग्निशमन दलाला कळविण्यात आले. थोडयाच वेळात अग्निशमन दल तिथे पोहचून e-Bike चा धूर विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल एक तास पाण्याचा मारा केल्यावर e-Bike मधून धूर निघण्याचे थांबले. परंतु त्या e-Bikem मधून धुर का निघत होते, याचे कारण कळू शकले नाही.
• हे पण वाचा :
• वारंवार घडत आहेत e-Bike पेट घेण्याच्या घटना :
e-Bike पेट घेण्याचा घटना वारंवार घडत आहेत. चार्जिंगला लावल्यानंतर आपोआपच इ- स्कूटरने पेट घेतलेला होता. त्याचप्रमाणे अनेक e-Bike, स्कूटरला असे प्रॉब्लेम होताना दिसून येत आहेत. त्यामुळे e-Bike तसेच ई- वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. ई – वाहनांवर लोकांनी विश्वास ठेवावा का नाही हा प्रश्न निर्माण होत आहे.
• हे पण वाचा :
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.