महागाई मध्ये मिळत आहे सर्वांत स्वस्त Ampere Magnus Neo स्कूटर |पहा किंमती सोबतच फीचर्स |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ampere Magnus Neo : नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षामध्ये जर आपण एखादी बजेट मध्ये बसणाऱ्या  किंमतीमध्ये चांगले फीचर्स असलेली स्कूटर शोधत असाल तर,  Ampere Magnus Neo ही इलेक्ट्रिक स्कूटर अतिशय परवडणाऱ्या किमतीमध्ये आणि चांगल्या फीचर्स मध्ये मिळत आहे. आपल्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये बरेच व्यवहारिक फीचर्स, डिझाईन, रेंज आणि इतरही वैशिष्ट्य पाहायला मिळतात. चला तर मग मित्रांनो पाहूया, Ampere Magnus Neo  या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल अधिक माहिती.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
Ampere Magnus Neo स्कूटर

Ampere Magnus Neo  हे इलेक्ट्रिक स्कूटर एका साध्या डिझाईन सोबत  तसेच आपल्याला जेवढे आवश्यक असतील तेवढे सर्व फीचर्स  परवडणाऱ्या किंमतीमध्ये मिळतात. किंमतीबद्दल सांगायचे झाल्यास Ampere Magnus Neo  इलेक्ट्रिक स्कूटर ची किंमत फक्त 79 हजार 999 रुपये इतकी आहे. या परवडणाऱ्या किमतीमध्ये कंपनीकडून  स्कूटर साठी विविध रंग पर्याय, चांगली टॉप स्पीड आणि रेंज  मिळते.

आपल्या बजेटमध्ये बसेल तसेच, दैनंदिन जीवनामध्ये, दररोजच्या कामासाठी तसेच ऑफिस कामासाठी सुद्धा ही स्कूटर आपण वापरू शकतो. कारण Ampere Magnus Neo या स्कूटरची रेंज आणि टॉप स्पीड  कमी किमतीमध्ये अतिशय चांगली मिळते. तसेच फीचर्स बद्दल सांगायचे झाल्यास, या स्कूटर मध्ये आपल्याला ऍडोमीटर, ट्रिप मीटर, टेल टेल लाईट, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी चा ऑप्शन मिळतो जे की यूएसबी पोर्ट ला सपोर्ट करणारे आहे, तसेच समोरच्या एप्रनला क्यूबी होल आहे, यामध्ये आपण छोट्या-मोठ्या  सामानाची ठेवण्याची व्यवस्था करू शकतो. म्हणजेच एकूणच स्कूटरमध्ये ज्या बेसिक गोष्टी हवे आहेत त्या सर्व या स्कूटरमध्ये मिळतात. आत्ताच्या इलेक्ट्रिक स्कूटर च्या , म्हणजेच बजाज चेतक, एथर, ओला सारख्या स्कूटरमध्ये जे डिजिटल फीचर्स जे की ऍडव्हान्स आहेत, तेवढे मिळत नसतील तरी, जे बेसिक फीचर्स आहेत त्या सर्व फीचर्स आपल्याला इथे मिळतात.

टॉप स्पीड आणि रेंज बद्दल सांगायचे झाल्यास,Ampere Magnus Neo  हे स्कूटर चालकास चांगली टॉप स्पीड आणि रेंज देते. 2.3kWh च्या लिथियम आयन फॉस्फेट च्या बॅटरी पॅक सोबत येते. जे की, 65kmph च्या टॉप स्पीड सोबतच, ही बॅटरी फुल चार्ज केली तर, 100km ची रेंज / चार्ज देते. तसेच Ampere Magnus Neo  बॅटरीला चार्जिंग होण्यासाठी  कमीत कमी वेळ लागतो.

Ampere Magnus Neo  या इलेक्ट्रिक स्कूटर च्या बॅटरी चार्जिंग साठी लागणारा वेळ हा इतर सर्व इलेक्ट्रिक स्कूटरच्या चार्जिंग साठी लागणाऱ्या वेळेइतकाच असून  फक्त बजाज चेतक साठी लागणारा  चार्जिंगचा वेळ हा कमी आहे. चार्जिंग च्या वेळेबद्दल सांगायची झाल्यास, Ampere Magnus Neo  स्कूटर ला पूर्ण चार्ज होण्यासाठी जे 0 ते शंभर टक्के चार्ज होण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. ही टायमिंग इतर सर्व  इलेक्ट्रिक स्कूटर  च्या मानाने सारखीच आहे.

Ampere Magnus Neo  इलेक्ट्रिक स्कूटर  पाच ड्युअल-टोन कलर स्कीममध्ये उपलब्ध आहे: मेटॅलिक रेड, ग्लेशियल व्हाइट, ओशन ब्लू, गॅलेक्टिक ग्रे आणि ग्लॉसी ब्लॅक. सर्व कलर  आकर्षक असून कमी किमतीमध्ये आपल्याला सर्व फीचर्स मिळतात.

123km रेंज वाली Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटर|मासिक EMI फक्त 3,022 रुपये |

130kmph च्या टॉप स्पीड ची Honda Hornet 2.0 बाईक साठी EMI फक्त 4,788 रुपयांचा|पहा किंमत|

नवीन Hero Destini 125: आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्ससह!

105kmph च्या टॉप स्पीड सोबत 212km/चार्ज ची जबरदस्त रेंज|मात्र कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये घेऊन या Simple One इलेक्ट्रिक स्कूटर |

Retro Bike: क्लासिक लूक आणि  क्रोम फिनिशिंग वाली बाईक फक्त 1 लाखात|पहा माइलेज सोबत फीचर्स|


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.