पैसा वसूल! Honda Unicorn बाईक | 60kmpl चे मायलेज आणि कौटुंबिक वापरासाठी एकदम जबरदस्त |पहा किंमत |

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Honda Unicorn: दैनंदिन वापरासाठी अतिशय  आरामदायी आणि  चांगली रायडींग अनुभव देणारी बाईक म्हणून Honda Unicorn बाईक आहे. जिचे अनेक भारतीय ग्राहक आजही अतिशय विश्वासाने या बाईकची खरेदी करतात. तिच्या शानदार इंजिन आणि जबरदस्त मायलेज मुळे तसेच परवडणाऱ्या किमतीमध्ये  सर्व व्यवहारिक फीचर्स मिळतात, इंजिनचा कुठलाही त्रास होत नाही, स्मूथ इंजिन व्यवस्था, बसण्यासाठी चांगली सीट, जिच्यामुळे बाईक चालवत असताना पाठीला कुठलाही त्रास होत नाही, सरळ आणि आरामदायी तसेच बाईकची डिझाईन सुद्धा छान असून हाताळण्यासाठी सोपी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

हे सर्व आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रतिक्रियांवरून सांगत आहोत, त्यामुळे या बाईकमध्ये नेमके  काय काय विशेष आहे,Honda Unicorn बाईकचे फीचर्स कसे आहेत, किंमत काय आहे, इंजिन कसे आहे, मायलेज किती देते  याविषयी  अधिक माहिती घेऊया.

Honda Unicorn

Honda Unicorn ही बाईक भारतीय बाजारामध्ये खूप पूर्वीपासून वापरली जाते. अनेक ग्राहक या बाईकचे चाहते. भारतातील जवळजवळ बऱ्याच परिवारांमध्ये या बाईकची उपस्थिती आहे. आपल्या  आजोबाच्या काळापासून या बाईचे ग्राहक  आहेत. अतिशय जुन्या काळापासून ही बाईक  आपल्या घराघरात वापरली जाते. काय आहे या बाईक मध्ये विशेष,हे जर सांगायचे झाल्यास, या बाईकचे फीचर्स हे मस्त शानदार असून फीचर्स मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, यामध्ये ऍडोमीटर, ट्रिप मीटर,स्पीडोमीटर, इको मोड इंडिकेटर, यूएसबी  टाईप सी चार्जिंग पोर्ट, सिंगल चॅनेल  ABS सिस्टीम, एलईडी हेडलाईट त्याचप्रमाणे गिअर पोझिशन इंडिकेटर  यासारखे  सर्व व्यवहारिक आणि उपयोगी फीचर्स या बाईक मध्ये मिळतात.

Honda Unicorn बाईकच्या इंजिन बद्दल सांगायचे झाल्यास, बाईक मध्ये आपल्याला  162.71cc, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन मिळते.जे  चांगली इंधन दक्षता , चांगली शक्ती आणि टॉर्क जनरेट करते. 7,500rpm वर 13.18PS ची शक्ती आणि 5,250rpm वर 14.58Nm टॉर्क जनरेट  करते. तसेच Honda Unicorn चे हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे असून अतिशय स्मूथ आणि चांगल्या रायडींग चा अनुभव देते.

Honda Unicorn चे इंजिन हे इंधन  दक्षता घेते म्हणजेच, इंधन ची खपत कमी  ठेवते. त्यामुळे  लांबच्या प्रवासासाठी चांगले मायलेज मिळते. त्याचप्रमाणे  शक्तिशाली इंजिन  आवाज करत नसल्यामुळे बाईक चालकास इंजिनचा  कुठलाही त्रास होत नाही. अनेक वर्षांपासून मजबूत आणि टिकाऊ म्हणून ही बाईक भारतीय ग्राहकांमध्ये  अजूनही प्रसिद्ध आहे.

Honda Unicorn breaking system

  ब्रेकिंग सिस्टीम बद्दल सांगायचे झाल्यास, Honda Unicorn बाईक मध्ये समोरील बाजूस 240mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 130mm ड्रम ब्रेक आहेत. फ्रंट आणि बॅक दोन्ही टायर ट्यूबलेस असून, ब्रेकिंग सिस्टीम चांगली मजबूत आहे. तसेच भारतातील रस्त्यांवर चालण्यासाठी ही ब्रेकिंग सिस्टीम उपयोगी पडते. बाईकच्या सीट ची उंची ही 798mm इतकी उंच असून, ती तरुण बाईक रायडर्स साठी अतिशय चांगली आहे. त्याचप्रमाणे बाईक चे कर्ब वजन हे 139kg इतके असून, बाईक हाताळण्यासाठी सोपी आहे.

बाईकच्या मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास, Honda Unicorn चे सरासरी मायलेज हे 60kmpl इतके आहे.  हायवेवर तसेच खड्ड्यांच्या रस्त्यावर सुद्धा चालण्यासाठी ही बाईक अतिशय मजबूत असून, चांगल्या मायलेजसाठी या बाईकला 13 लिटरची मोठी इंधन टाकी दिलेली आहे. त्यामुळे आपण दैनंदिन वापरामध्ये  दूरचा प्रवास सुद्धा करू शकतो. 187mm च्या ग्राउंड क्लिअरन्स सोबत, शक्तिशाली इंजिन मुळे , इंधनाची खपत कमी होते आणि मायलेज चांगले मिळते.

Honda Unicorn बाईक मध्ये आपल्याला रंग पर्याय सुद्धा निवडण्याचा ऑप्शन मिळतो. बाईक च्या रंग पर्यायाबद्दल सांगायचे झाल्यास, या बाईक मध्ये आपल्याला एकूण तीन रंग पर्याय मिळतात.  पर्ल इग्नियस ब्लॅक, मॅट ॲक्सिस ग्रे मेटॅलिक आणि रेडियंट रेड मेटॅलिक.

चांगल्या शक्तिशाली इंजिन सोबत इतरही वैशिष्ट्ये बाईक मध्ये सर्व उपयोगी असल्यामुळे, ग्राहकांच्या निवडीचा अजून पर्याय उपलब्ध होतो.

Honda Unicorn price

बाईकच्या शोरूम किमती बद्दल सांगायचे झाल्यास, Honda Unicorn बाईक ची शोरूम किंमत ही, 1 लाख 19 हजार 481 इतकी आहे. ( एक्स शोरूम दिल्ली.) बाईक एकाच प्रकारात येते. तसेच बाईकची फीचर्स आणि  इंजिन मजबूत तसेच अपडेटेड असल्यामुळे  आवश्यक त्या सर्व गोष्टी बाईक मध्ये नवीन बाईक खरेदी दारास मिळतात.

Honda Unicorn या बाईक च्या किमती मध्येच आपल्याला, दुसरी बाईक सुद्धा खरेदी करता येऊ शकते. याच श्रेणीमध्ये, तसेच किमतीमध्ये, TVS Apache RTR 160, Bajaj Pulsar 150, Yamaha FZ v3, आणि Hero Xtreme 160R या बाईक सुद्धा खरेदी करण्याचा ऑप्शन आपल्याला उपलब्ध आहे.

Honda Unicorn, Honda Unicorn bike 2025, Honda Unicorn price, Honda Unicorn mileage,Auto news in Marathi,Auto,Automobile,fullautomobile.

महागाई मध्ये मिळत आहे सर्वांत स्वस्त Ampere Magnus Neo स्कूटर |पहा किंमती सोबतच फीचर्स |

123km रेंज वाली Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटर|मासिक EMI फक्त 3,022 रुपये |

130kmph च्या टॉप स्पीड ची Honda Hornet 2.0 बाईक साठी EMI फक्त 4,788 रुपयांचा|पहा किंमत|

नवीन Hero Destini 125: आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्ससह!

105kmph च्या टॉप स्पीड सोबत 212km/चार्ज ची जबरदस्त रेंज|मात्र कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये घेऊन या Simple One इलेक्ट्रिक स्कूटर |


Discover more from fullAutomobile

Subscribe to get the latest posts sent to your email.