Kia Syros : नमस्कार मित्रांनो, 2025 मध्ये, म्हणजे त्या नवीन वर्षामध्ये जर आपण कमी किमतीमध्ये एखादी लक्झरी कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेले आहोत एक जबरदस्त कारचा ऑप्शन. Kia Syros ही त्यापैकी एक आहे. जबरदस्त फीचर्स ची लिस्ट तसेच भारतातील सर्वात प्रीमियम कार पैकी एक असलेली ही कार असून ती EV9 द्वारे प्रेरित आहे. बजेटमध्ये बसणारे किमतीमध्ये अनेक फीचर्स तसेच प्रीमियम इंटिरियर, घोड्यासारखी तेज रफ्तार असलेली ही कार दोन इंधन पर्यासह येते. पेट्रोल आणि डिझेलच्या इंधन पर्यायाबरोबरच कार चे इंजिन शक्तिशाली असून कार ची डिझाईन सुद्धा आकर्षक आणि प्रीमियम आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!चला तर मग मित्रांनो, Kia Syros च्या किंमत, फीचर्स, इंजिन,मायलेज बद्दल जाणून घेऊया अधिक माहिती.
• Kia Syros ची किंमत :
परवडणाऱ्या किमतीमध्ये तसेच ग्राहकांच्या बजेटचा विचार करूनच किया ने Kia Syros ची किंमत ठेवलेली आहे. Kia Syros ही सहा व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून HTK, HTK (O), HTK Plus, HTX, HTX Plus, आणि HTX Plus (O). त्यांची किंमत 9.70 लाखापासून 16.50 लाखांपर्यंत आहे. उत्कृष्ट फीचर्स सोबत कार मध्ये आपल्याला रंग पर्याय सुद्धा मिळतात. तसेच आकर्षक डिझाईन आणि चांगली स्पेस यामुळे कार प्रवासाचा चांगला सुखद अनुभव देते.
• Kia Syros चे प्रीमियम फीचर्स :
Kia Syros च्या फीचर्स विषयी सांगायचे झाल्यास, त्यामध्ये आपल्याला ऍडव्हान्स फीचर्स ची लिस्ट मिळते. सर्वात आधी वायरलेस फोन चार्जर जे की सर्वांसाठी उपयोगी आहे, त्यानंतर पुश बटन/ स्टार्ट- स्टॉप चे फीचर, पॅनोरमिक सुनरूफ, ऑटो एसी, 12.3 इंच टच स्क्रीन, 5 इंच क्लायमेट कंट्रोल डिस्प्ले , ड्रायव्हर डिस्प्ले, आठ- स्पीकर हरमन कार्डन साऊंड सिस्टिम, 4- वे पॉवर ड्रायव्हर सीट, तसेच 64-रंग ॲम्बियंट लाइटिंग सुद्धा मिळते.
• Kia Syros चे इंजिन परफॉर्मन्स आणि ट्रान्समिशन :
Kia Syros ही प्रीमियम कार जबरदस्त फीचर्स सोबत अनेक चांगल्या सुविधा सुद्धा देते. त्याचप्रमाणे , कार चे शक्तिशाली इंजिन चांगली हॉर्सपावर आणि टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिन दोन इंधन पर्यायांसोबत येतो. इंजिनबद्दल अधिक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
• 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन (MT) किंवा 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशन (DCT) सह 1-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन जे 120 PS आणि 172 Nm चा वेग वाढवते.
•116 PS आणि 250 Nm च्या आउटपुटसह 1.5-लिटर डिझेल इंजिन, 6-स्पीड MT किंवा 6-स्पीड AT सह जोडलेले आहे.
• Kia Syros चे दमदार मायलेज :
Kia Syros दोन इंधन पर्यायासोबत पावरफुल इंजिन आणि चांगल्या मायलेजचा दावा करते. मायलेज बद्दल आकडेवारी खालील प्रमाणे दिलेली आहे.
• 1-लिटर टर्बो-पेट्रोल MT – 18.20 kmpl
• 1-लिटर टर्बो-पेट्रोल MT DCT – 17.68 kmpl
• 1.5-लिटर डिझेल MT – 20.75 kmpl
• 1.5-लिटर डिझेल AT – 17.65 kmpl
• Kia Syros ची सुरक्षा सुविधा :
अनेक दमदार फीचर्स तसेच बजेट कोणते बसणाऱ्या किंमतीमध्ये Kia Syros अनेक दमदार फीचर्स आणि सुरक्षा सुविधा सुद्धा पुरवते. सुरक्षा सुविधांमध्ये आपल्याला फ्रंट पार्किंग सेन्सर्स,6 एअर बॅग, ऑटो होल्ड, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ड्युअल डॅशकॅम सेटअप, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टिम, लेन कीप असिस्ट, ESC, तसेच ISOFIX चाइल्ड सीट अँकरेज इत्यादी सुरक्षा सुविधा मिळतात.
• Kia Syros चे रंग पर्याय :
Kia Syros 8 विविध मोनोटोन रंग पर्यायांमध्ये येते. त्यामुळे ग्राहकांना आपल्या पसंतीचा कलर निवडण्याचा पर्याय उपलब्ध होत असतो. आठ आकर्षक रंगांमध्ये फ्रॉस्ट ब्लू, स्पार्कलिंग सिल्व्हर, ग्रॅव्हिटी ग्रे, इम्पीरियल ब्लू, इंटेन्स रेड, प्युटर ऑलिव्ह, ग्लेशियर व्हाइट पर्ल आणि अरोरा ब्लॅक पर्ल हे रंग येतात.
सर्व आठही रंग हे आकर्षक असून आपण आपल्या आवडीचा रंग पर्याय निवडू शकतो.
2024 Bike News,2025 bike news,Auto,Auto news in Marathi,Automobile news.,Bike news,Fullautomobile,Kia Syros,Kia Syros engine & transmission,Kia Syros mileage,Kia Syros Price,
• हे पण वाचा 👇:
•नवीन Yamaha RX 100: खास फीचर्स आणि किंमत|
•KTM RC 390 Modified बाईक का आहे Best Sport Bike?
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.