Kia Syros: नमस्कार मित्रांनो, Kia Syros ही जबरदस्त आकर्षक डिझाईन असलेली, दमदार फीचर्स आणि चांगली स्पेस आणि कौटुंबिक वापरासाठी अतिशय चांगल्या स्पेस सोबत नुकतीच लॉन्च झालेली आहे. नवीन वर्षामध्ये म्हणजेच 2025 मध्ये जर आपल्याला बजेटमध्ये बसणाऱ्या किमतीमध्ये, चांगले फीचर्स, आकर्षक डिझाईन, रंग पर्याय, कार मध्ये फॅमिली साठी चांगली स्पेस इत्यादी सर्व अपेक्षा पूर्ण करणारी जर कार खरेदी करण्याची अपेक्षा असेल तर Kia Syros ही कार आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यातनक्कीच यशस्वी ठरते.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• Kia Syros ची वैशिष्ट्ये काय आहेत :
वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाल्यास, Kia Syros मध्ये बरेच अशी वैशिष्ट्ये मिळतात जी की आपल्याला व्यवहारिक आणि सर्वात उपयोगी आहेत. ती पुढील प्रमाणे :
• वायरलेस फोन चार्जर: Kia Syros मध्ये आपल्याला वायरलेस फोन चार्जर चा पर्याय मिळतो, जो की आत्ताच्या काळामध्ये सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा आहे. या वैशिष्ट्यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी तसेच प्रवाशांसाठी फोन चार्जिंग चा प्रश्न मिटतो.
• पॅनोरमिक सनरूफ: पॅनोरमिक सनरूफ मुळे प्रवासामध्ये अनेक प्रकारे आपल्याला हवेशीर आनंद घेता येतो. कार मध्ये हवा चांगली खेळती राहते तसेच बाहेरच्या वातावरणाचा सुद्धा आनंद घेता येतो.
त्याचप्रमाणे इतर वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला असे सांगता येते की, Kia Syros मध्ये ऑटो एसी, 12.3 इंच टचस्क्रीन, 5 इंच क्लायमेट कंट्रोल डिस्प्ले, जबरदस्त साऊंड सिस्टिम, ड्रायव्हर डिस्प्ले, 64-रंगी ॲम्बियंट लाइटिंग, 4-वे पॉवर ड्रायव्हर सीट, एक पुश-बटण यासारखे सर्व व्यवहारिक आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला Kia Syros मध्ये मिळतात.
• Kia Syros चे इंजिन आणि ट्रान्समिशन :
Kia Syros हे दोन इंजिन पर्यायांसह येते, 998 cc – 1493 cc इंजिन.
6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन (MT) किंवा 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशन (DCT) सह 1-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन जे 120 PS ची शक्ती आणि 172 Nm चा टॉर्क जनरेट करते.
116 PS आणि 250 Nm च्या आउटपुटसह 1.5-लिटर डिझेल इंजिन, 6-स्पीड MT किंवा 6-स्पीड AT सह जोडलेले आहे.
• Kia Syros चे मायलेज:
Kia Syros हे दमदार मायलेज ची हमी देते. मायलेज बद्दल सविस्तराकडे पुढील प्रमाणे :
- 1-लिटर टर्बो-पेट्रोल MT – 18.20 kmpl
- 1-लिटर टर्बो-पेट्रोल MT DCT – 17.68 kmpl
- 1.5-लिटर डिझेल MT – 20.75 kmpl
- 1.5-लिटर डिझेल AT – 17.65 kmpl
• Kia Syros ची सेफ्टी फीचर्स :
Kia Syros ही अनेक प्रीमियम वैशिष्ट्यांसह येते. तसेच भारतातील सर्वात प्रीमियम सब-4 मीटर SUV पैकी एक आहे. त्याचप्रमाणे सुरक्षा फीचर्स विषयी सांगायचे झाल्यास Kia Syros मध्ये सर्व उच्च सुरक्षा सुविधा मिळतात. 360 डिग्री कॅमेरा, एअर बॅग, एक रिव्हरसिंग कॅमेरा, लेन कीप असिस्ट, चाईल्ड सीट अँकरेज, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टीम, पार्किंग सेन्सर, ESC सारखे सुरक्षा फीचर्स मिळतात.
• Kia Syros किती रंग ऑफर करते:
Kia Syros ही आठ रंग पर्याय ऑफर करते. सर्व रंग आकर्षक आणि जबरदस्त आहेत. ते पुढीलप्रमाणे :
फ्रॉस्ट ब्लू, स्पार्कलिंग सिल्व्हर, ग्रॅव्हिटी ग्रे, इम्पीरियल ब्लू, इंटेन्स रेड, प्युटर ऑलिव्ह, ग्लेशियर व्हाइट पर्ल आणि अरोरा ब्लॅक पर्ल.
• Kia Syros ची किंमत आणि व्हेरिएंट :
भारतातील सर्वात प्रेमियम आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये Kia Syros ही प्रीमियम सब-4 मीटर SUV पैकी एक आहे. हिच्या किमती बद्दल सांगायचे झाल्यास, 9 लाखापासून या SUV ची सुरुवात होते तर, 17.80 लाखांपर्यंत किंमत आहे.
त्यामध्ये 6 व्हेरिएंट मिळतात. HTK, HTK (O), HTK Plus, HTX, HTX Plus, आणि HTX Plus (O)
Kia Syros, Kia Syros price, Kia Syros price in India
• हे पण वाचा👇:
•नवीन वर्षात खरेदी करा TVS Apache RTR 310 बाईक आणि मिळवा खतरनाक माईलेज|पहा किंमत आणि फीचर्स|
•पैसा वसूल! Honda Unicorn बाईक | 60kmpl चे मायलेज आणि कौटुंबिक वापरासाठी एकदम जबरदस्त |पहा किंमत |
•महागाई मध्ये मिळत आहे सर्वांत स्वस्त Ampere Magnus Neo स्कूटर |पहा किंमती सोबतच फीचर्स |
•123km रेंज वाली Ather Rizta इलेक्ट्रिक स्कूटर|मासिक EMI फक्त 3,022 रुपये |
•130kmph च्या टॉप स्पीड ची Honda Hornet 2.0 बाईक साठी EMI फक्त 4,788 रुपयांचा|पहा किंमत|
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.