बाईक ची विक्रीच होत नाही म्हणून कंपनीने ,Triumph Speed T4 च्या किमतीत केली मोठी घसरण| जाणून घ्या आत्ताची किंमत आणि मायलेज |
येता नवीन वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये ट्रायम्फ कंपनी आपले नवीन मॉडेल मार्केटमध्ये उतरवण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे जुन्या मॉडेलची विक्री लवकरात लवकर करून युनिट संपवण्याच्या मार्गावर कंपनी असल्यामुळे Triumph Speed T4 च्या किमतीमध्ये मोठी घट केलेली आहे. ट्रायम्फ कंपनीने Triumph Speed T4 या बाईकची विक्री ही दरमहा दहा हजार युनिटची करण्याची योजना बनविली होती परंतु, दहा हजार तर सोडा परंतु, त्याचा अर्धा पल्ला सुद्धा बाईकने गाठलेला नाही. फक्त तीन ते चार हजारापर्यंत च्या विक्रीच्या युनिट मुळे, कंपनीने ही मोठी ऑफर ग्राहकांसाठी केलेली आहे.