TVS Jupiter On Road Price: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आमच्या या नवीन आणि फ्रेश आर्टिकल मध्ये. आपल्याला माहित असेल ,TVS Jupiter हे भारतातील सर्वाधिक विक्री होणारे स्कूटर आहे.तसेच बजेट मध्ये बसणारया किमतीमध्ये अनेक फीचर्स आणि दमदार माइलेज सोबत आकर्षक डिझाईन मिळत आहे. तसेच हे स्कूटर फक्त आपल्या आकर्षक डिझाईन आणि किमतीमुळे ग्राहकांचे ध्यान आकर्षित करत नाही तर आपल्या दमदार फीचर्स मुळे सुद्धा भारतातील नंबर वन सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटर पैकी एक ठरलेले आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• TVS Jupiter चे स्टायलिस्ट डिझाईन आणि रंग :
TVS Jupiter 4 प्रकारांमध्ये येते, Drum, Drum Alloy, SmartXonnect Drum आणि SmartXonnect डिस्क. तसेच आपल्या प्रकारांच्या नुसार TVS ज्युपिटर 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे, ड्रम प्रकारात उल्का रेड ग्लॉस, टायटॅनियम ग्रे मॅट आणि लुनर व्हाइट ग्लॉस रंग. ड्रम अलॉय प्रकारात स्टारलाईट ब्लू ग्लॉस, टायटॅनियम ग्रे मॅट आणि लुनर व्हाइट ग्लॉस रंग. SmartXonnect Drum आणि SmartXonnect डिस्क प्रकार डॉन ब्लू मॅट, गॅलेक्टिक कॉपर मॅट आणि स्टारलाईट ब्लू ग्लॉस रंगांमध्ये येतात.
तसेच TVS Jupiter च्या आकर्षक डिझाईन बद्दलअजून सांगायचे झाल्यास, इथे आपल्याला एक प्रशस्त आणि आरामदायी चांगली गादी असलेली सीट मिळते, जे की चालकास स्कूटर चालवत असताना आरामदायी आणि आनंददायी रायडींग चा अनुभव देते. तसे संपूर्ण स्कूटर ही एलईडी लाइटिंग सेटअप ने सुसज्ज आहे, जबरदस्त इंजिन आणि स्कूटर मधील अनेक फीचर्स हे आधुनिक तसेच उपयोगी व्यावहारिक आहेत.
• हे पण वाचा 👇:
•Honda QC1: पाच वर्षांच्या जबरदस्त बॅटरी वॉरंटी सोबत 80km ची रेंज |नवीन वर्षामध्ये होईल लॉन्च |
• TVS Jupiter बेस्ट features :
आधुनिक तसेच व्यवहारीक फीचर्स मुळे TVS ज्युपिटर हे दररोजच्या वापरासाठी तसेच ऑफिशियल यूज साठी सुद्धा जबरदस्त आहे. कारण या स्कूटरचे माइलेज दररोजच्या वापरासाठी स्कूटर चालकास चांगली सेवा देत असल्यामुळे ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करते. तसेच बाकी अजून काही विशेष मध्ये आपल्याला असे दिसते की, संपूर्ण स्कूटर ही एलईडी लाईट ने सेटअप आहे. व्हॉइस असिस्टंट, मोबाईल चार्जर, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, एसएमएस अलर्ट, LED इन्स्ट्रुमेंट कन्सोल तसेच फाइंड मी फीचर आणि नेविगेशन सारखे आधुनिक फीचर्स स्कूटर मध्ये असल्यामुळे TVS Jupiter अजूनच व्यवहारिक बनते.
• TVS Jupiter इंजिन आणि माइलेज:
TVS Jupiter इंजिन: TVS ज्युपिटर हे 113.3cc च्या जबरदस्त आणि पावरफुल हायब्रिड इंजिनद्वारे समर्थित आहे जे हायब्रिड सहाय्याशिवाय 9.2Nm @ 5000rpm आणि हायब्रिड सहाय्यासह 9.8Nm @ 5000rpm बनवते. सूत्रांच्या माहितीनुसार, TVS Jupiter चे इंजिन हे आधीच्या पेक्षा खूपच पावरफुल आणि दमदार असून नवीन इंजिन मध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे इंजिनची हायब्रीड प्रणाली स्कूटरचा वेग वाढवण्यास मदत करते.
TVS Jupiter माइलेज: आपल्या पावरफुल इंजिन आणि दमदार मायलेज मुळे TVS Jupiter अनेक ग्राहकांची पहिली पसंत आहे. TVS ही कॉलेज स्टुडंट्स तसेच अनेक लोकांची दररोजच्या वापरातील विश्वासू वाहन असल्यामुळे तसेच मजबूत आणि किफायतशीर असल्यामुळे परवडणारे ठरते. मायलेज बद्दल सांगायचे झाल्यास, TVS Jupiter 48kmpl चे जबरदस्त मायलेज आपल्याला मिळते.
• हे पण वाचा 👇:
• TVS Jupiter ची परवडणारी किंमत:
आणि जबरदस्त फीचर्स मुळे TVS Jupiter हे भारतातील सगळ्यात जास्त विक्रम होणाऱ्या स्कूटर पैकी एक स्कूटर ठरत आहे. तसेच सर्व व्यवहारिक फीचर्स सोबत आकर्षक डिझाईन आणि मायलेज जबरदस्त इंजिन सारख्या अनेक फीचर्स मुळे सुद्धा TVS Jupiter ची किंमत वाढलेली नसून, ती अनेकांना तसेच सामान्य ग्राहकाला सुद्धा परवडणारी आहे. TVS Jupiter ची मार्केट किंमत ही 74,691 लाख ते 87,791 लाखांपर्यंत आहे.
• TVS Jupiter On Road Price :
TVS ज्युपिटरची दिल्लीतील ऑन-रोड किंमत रु.88,561 रुपये इतकी आहे.तसेच RTO शुल्क आणि विमा यांचा पण समावेश आहे.
• हे पण वाचा 👇:
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.