Honda Livo: होंडा कंपनी आपल्या वाहन उद्योगातील एक क्रांतिकारी बदल घेऊन आलेली आहे. तिचा अद्वितीय कामगिरीमुळे होंडा कंपनी अनेक दशकांपासून भारतीय ग्राहकांचा विश्वास संपादन केलेली आहे. त्यातच फोर व्हीलर सोबत टू व्हीलर चा सुद्धा समावेश होतो. Honda Livo ही त्यामधीलच एक क्रांतिकारी बदलाची एक नवी दिशा आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि सौंदर्यशास्त्राची संज्ञा घेऊन आलेल्या बाईक वैशिष्ट्यामुळे ही बाईक अनेक ग्राहकांची विश्वसनीय तसेच पहिली पसंत ठरली आहे. किमतीमध्ये कमी असून सुद्धा तिचे वैशिष्ट्यपूर्ण आणि खास फीचर्स बाईकला वेगळेपण देतात. दमदार आणि पावरफुल इंजिन तंत्रज्ञानासह बाईकच्या इतरही गोष्टी खास आहेत. चला तर मग पाहूया, Honda Livo ची मार्केट मधील किंमत, फीचर्स, इंजिन, मायलेज तसेच आकर्षक डिझाईन बद्दल अधिक माहिती.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!• Honda Livo ची आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन :
आपल्या आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन मुळे Honda Livo ग्राहकांना आपल्याकडे सहज आकर्षित करते.Honda Livo कंपनीकडून दोन प्रकारांमध्ये उपलब्ध केलेली आहे ड्रम आणि डिस्क आणि यामध्ये आपल्याला रंग पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत.Honda Livo तीन वेगवेगळ्या रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: ब्लॅक, ॲथलेटिक ब्लू मेटॅलिक आणि मॅट क्रस्ट मेटॅलिक.
रंग निवडण्याच्या पर्यायामुळे ग्राहक आपल्या पसंतीनुसार रंग पर्याय निवडू शकतात. तसेच बाईकची आकर्षक रचना असून तिला अजून खास बनवण्यासाठी तसेच तिला आधुनिक आणि उत्कृष्ट लूक देण्यासाठी तिच्यामध्ये अनेक खास फीचर्स समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
• हे पण वाचा 👇:
• सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल : बाईक मधील या फीचर मुळे बाईक रायडर्स ला मूलभूत माहिती मिळते जसे की, बाईचा वेग, अंतर,प्रवास, सरासरी मायलेज, कमी इंधन इंडिकेटर, रियल टाईम मायलेज, सर्विस ड्यू इंडिकेटर यासारखी मूलभूत आणि महत्त्वाची माहिती सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलमुळे मिळते.
• इंजिन स्टार्ट/ स्टॉप स्विच बटन : या फीचरमुळे बाईक हाताळण्यासाठी सोपी जाते.
• आरामदायी सीट : Honda Livo मध्ये आपल्याला 790mm इतक्या उंचीची सीट मिळते. तसेच सीट ही लांब रुंद आणि उंची असल्यामुळे बाईक चालकास रायडींग पोस्ट्चर साठी आराम मिळतो.
• ट्यूबलेस टायर : बाईकला समोर आणि मागील बाजूस 80/100-18 ट्यूबलेस टायर मिळतात. ज्यामुळे बाईक चालकास अजून सुरक्षित अनुभव मिळतो.
• मोठी इंधन टाकी : Honda Livo मध्ये 9 लिटर ची जबरदस्त मोठी इंधन टाकी मिळते. ज्यामुळे बाईकचा लुक तर बदललेला आहे परंतु, दूरच्या प्रवासासाठी सुद्धा हे उपयोगिता आहे.
• हे पण वाचा 👇:
•Honda Livo ब्रेक आणि सस्पेन्शन तंत्रज्ञान :
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ब्रेक आणि सस्पेन्शन तंत्रज्ञानामुळे Honda Livo मार्केट मध्ये क्रांतिकारी बदल केलेले जाणवते.
•ब्रेक : ब्रेकिंग सेटअपमध्ये 240 मिमी डिस्क (डिस्क प्रकारात) किंवा समोर 130 मिमी ड्रम आणि मागील बाजूस 130 मिमी ड्रम असतो. बाईकला समोर आणि मागील बाजूस 80/100-18 ट्यूबलेस टायर मिळतात आणि कॉम्बी ब्रेक सिस्टीम (CBS) सह दोन्ही टोकांना इष्टतम ब्रेकिंग फोर्स वितरीत करते, कमी ब्रेकिंग अंतर सुनिश्चित करते.
• सस्पेन्शन :Honda Livo हिरा-प्रकारच्या फ्रेमवर बांधली गेली आहे आणि समोर एक दुर्बिणीसंबंधीचा काटा आणि 5-स्टेप प्री-लोड ऍडजस्टेबिलिटीसह ड्युअल-स्प्रिंग शॉक शोषक आहे. ज्यामुळे बाईक अडथळा तसेच खड्ड्याच्या ठिकाणी बाईक रायडर्स ला त्रास होण्यापासून सुरक्षित करते.
• Honda Livo आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पावरफुल इंजिन तंत्रज्ञान वैशिष्ट्ये :
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पावरफुल इंजिन मुळे बाईक जबरदस्त मायलेज आणि आरामदायी रायडींग चा अनुभव देते. तसेच स्मूथ इंजिन बाईक चालवत असताना कुठला ही आवाज न करता शांतपणे सुरू राहते.
Honda Livo च्या प्रगत इंजिन तंत्रज्ञानाबद्दल सांगायचे झाल्यास Honda Livo मध्ये BS6.2-सुसंगत 109.51cc, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड मोटर आहे, जी 8.79 PS @ 7,500 rpm आणि 9.30 Nm @ 5,500 rpm जनरेट करते. पॉवरट्रेन 4-स्पीड ट्रान्समिशनसह जोडलेली आहे. बाइकमध्ये ACG स्टार्टर मोटर सिस्टीम आहे जी इंजिनला धक्का न लावता शांतपणे सुरू होण्यास मदत करते.
• हे पण वाचा 👇:
•Mahindra Bolero फक्त 9 लाखात|कशी पण चालवा,जबरदस्त मजबूती|7 सीटर चा पर्याय|पहा किंमत |
• Honda Livo चे जबरदस्त मायलेज :
आपल्या परवडणाऱ्या किमती मध्ये बाईक कोणालाही खरेदी करता येऊ शकते. तसेच तिच्या फीचर आणि मायलेजमुळे सुद्धा बाईक खास वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. 60kmpl च्या जबरदस्त मायलेज मुळे दैनंदिन जीवनातील वापरासाठी, तसेच दैनंदिन ऑफिशियल वापरासाठी बाईक उत्तम मायलेज देते.
• Honda Livo ची परवडणारी किंमत:
परवडणाऱ्या किमतीमध्ये होंडाने Honda Livo ची बाईक मार्केटमध्ये उतरवली आहे. Honda Livo ही 110cc कम्युटर बाईक आहे आणि Honda CB Twister ची उत्तराधिकारी आहे . Honda Livo ब्रँडच्या मोटरसायकल पोर्टफोलिओमध्ये Honda CD 110 Dream सोबत विकली जाते.
Honda Livo च्या परवडणाऱ्या किमती बद्दल सांगायचे झाल्यास, 79,651 पासून 83,651 पर्यंत या बाईकची किंमत आहे. 1 लाखाच्यामध्येच बाईक ची किंमत असल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाला सुद्धा ही बाईक खरेदी करण्यासाठी परवडते.
तसेच लांबचा प्रवास दररोजच्या दैनंदिन जीवनातील वापर यासाठी सुद्धा ही बाईक उपयोगी असल्यामुळे खरेदी करण्यासाठी परवडते.
• Honda Livo चे मार्केटमधील पर्याय:
तुलनेने कमी किमतीत असलेले बजाज प्लेटिना 110 ABS Honda Livo पेक्षा काही अधिक वैशिष्ट्यपूर्ण घटक घेऊन येते. त्यामुळे या सर्व टू व्हीलर Honda Livo चार्ज किंमत श्रेणीमध्ये येत असून मार्केट मधील ग्राहकांसाठी पर्याय ठरू शकतात.
Honda Livo ला Hero Passion XTEC , TVS Star City Plus आणि Hero Super Splendor जबरदस्त टक्कर देते.Honda Livo पेक्षा या बाईक थोड्या अधिक शक्तिशाली असून ग्राहकांना या सुद्धा पसंतीस उतरलेले आहेत. परंतु समान किमतीमध्ये आहेत.
• Honda Livo EMI :
जर आपल्याला सोप्या EMI वर Honda Livo बाईक खरेदी करायचे असेल तर, आपण अगदी सोप्या आणि कमीत कमी डाऊन पेमेंट वर ही बाईक खरेदी करू शकता. त्यासाठी आपल्याला जवळच्या होंडा शोरूम ला भेट द्यावी लागेल.
थोडक्यात, ईएमआय ऑफर सांगायची झाल्यास, आपण बाईकच्या किमतीनुसार 36 महिन्यांसाठी 2706 रुपयांच्या मासिक सुलभ हप्त्यांच्या ईएमआय वर ही बाईक खरेदी करू शकता.
• हे पण वाचा 👇:
•Honda QC1: पाच वर्षांच्या जबरदस्त बॅटरी वॉरंटी सोबत 80km ची रेंज |नवीन वर्षामध्ये होईल लॉन्च |
Discover more from fullAutomobile
Subscribe to get the latest posts sent to your email.